आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • US Vice President Kamala Harris News Updats | In Saga Of Immigration, Indians Travel From Exclusion To Vice Presidency

भारतीयांचा प्रवास:230 वर्षांपूर्वी चेन्नईमधून पहिली व्यक्ती अमेरिकेत पोहोचली होती, आज त्याच परिसरातील मुलगी तेथील व्हाइस प्रेसिडेंट बनणार

6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 230 वर्षांपूर्वी सुरू झाला होता प्रवास

पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात, भारतातील प्रवासी आपले मार्ग तयार करत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 210 देशांमध्ये सुमारे 1.34 कोटी NRI आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ ही संख्या पावने दोन कोटी असल्याचे सांगते. कमला हॅरिस हे सीमा-पलीकडे नाव कमावणाऱ्यांमधील सर्वात अलिकडील नाव आहे. त्या आज अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होतील. भारतीय प्रवाशांचा हा प्रवास कधीच सोपा नव्हता. या स्टोरीमध्ये आम्ही या प्रवासाबद्दल सांगत आहोत.

230 वर्षांपूर्वी सुरू झाला होता प्रवास
मद्रास (आता चेन्नई) येथे राहणारी एक व्यक्ती सर्वात पहिले अमेरिकेच्या तटावर पोहोचली होती. 1790 या वर्षीची ही गोष्ट आहे. ज्या भागात श्यामला गोपालन यांचे कुटुंब राहते याच भागातील ती व्यक्ती होती. श्यामला गोपालन या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या आई. याच्या 230 वर्षांनंतर आता श्यामला गोपालन यांची मुलगी व्हाइस प्रेसिडेंट बनणार आहे. हा अमेरिकेत भारतीयांसाठी एक मोठा राजकीय प्रवासही आहे.

त्या दरम्यान त्यांनी बहिष्काराचा सामना केला. त्यांना नागरिकत्त्व देऊन परत घेण्यात आले. भेदभावाचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी स्वतःसाठी अधिकार मिळवले. लोकल काउंसिलपासून सरकारमध्येही निवडणून आले. व्हाइस प्रेसिडेंट म्हणून निवडणून येण्यापासून तर अने मोठ्या कंपन्यांचे हेड बनले. नोबेल पुरस्कार जिंकले आणि यूनिव्हर्सिटीजचे नेतृत्त्व केले.

अशा प्रकारे ते सर्वाधिक उत्पन्न आणि शिक्षण मिळविणारा समुदाय बनले. आता भारतीय प्रवाशी अमेरिकेच्या लोकसंख्येत एक टक्के थोडे जास्त हिस्सेदार आहेत. हा समुदाय झपाट्याने प्रगती करत आहे.

गेल्या शतकाच्या सुरुवातीला पहिली लाट अमेरिकेत पोहोचली
अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांच्या पहिल्या लाटेत सर्वात जास्त शिखांचा समावेश होता. मागच्या शतकाच्या सुरुवातीला ते कॅनडामधून अमेरिकेत पोहोचले होते. तेथे शेतक आणि लाकडांच्या मिलवर काम करायला गेले होते. दुसऱ्या एशियाई प्रमाणे त्यांनाही वर्णभेदाचे हल्ले सहन करावे लागले. 1917 मध्ये इमिग्रेशन अॅक्टनुसार आशियाईंनी येण्यावर बंदी घालण्यात आली होती.

 • 18 व्या शतकातील एका कायद्याने त्यांना काही सीमांसह नागरिकत्त्व दिले. 1910 नंतर कोर्टाने काही भारतीयांना नागरिकत्त्व देण्याची परवानगी दिली. कारण त्यांना कोकेशियान समुदायाचे सदस्य मानले जात होते.
 • 1923 च्या अखेरिस भगत सिंह थिंद यांचे नागरिकत्व हिसकावण्यात आले. ते अमेरिकन सैन्यात राहिले होते. ते कोकेशियान होऊ शकतात असा निर्णय देण्यात आला, मात्र भारतीय श्वेत मानले जाऊ शकत नाही. या दरम्यान अनेक भारतीयांना देण्यात आलेले नागरिकत्त्व रद्द करण्यात आले. मात्र, त्यांना देशात राहू देण्यात आले.
 • 1935 मध्ये भगत सिंह थिंद यांना पुन्हा नागरिकत्व मिळाले. एका नवीन कायद्याने जातीय ओळखीची परवा न करता सर्वत फॉर्मर सर्व्हिस पर्सनल यांना नागरिकत्त्व दिले. याच काळात अनेक भारतीय शिक्षण, व्यवसाय आणि रिलीजस टीचर्स बनून अमेरिकेत गेले. त्यामधील काही तिथलेच झाले. यामधून एक दिलीप सिंह सौंड होते. ते बर्कलेमध्ये कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीमधून PhD करण्यासाठी गेले होते.
 • 1946 मध्ये एका कायद्याच्या माध्यमातून 100 भारतीयांना एनुअल इमिग्रेशन कोटा मिळाला. याने दिलीप सिंह अमेरिकन नागरिक बनले. 1956 मध्ये त्यांना US हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ससाठी निवडण्यात आले. असे करणारे ते पहिले भारतीय-अमेरिकी बनले. यानंतर त्यांनी दोन वेळा निवडणूक जिंकली.
 • 1960 मध्ये अमेरिकेत सिव्हिल राइट्स मूव्हमेंट सुरू होती. याने अमेरिकी सिस्टममध्ये सामिल वर्णभेदाकडे लक्ष केंद्रीत केले. 1965 मध्ये कायदा बनवून इमिग्रेशन मशीनरी संपवण्यात आली. शेजारी देश सोडून सर्व देशांचे 20,000 इमिग्रेंट्ससाठी एनुअल कोटा करण्यात आला. यामुळे भारतीय प्रवाशांचा मार्ग मोकळा झाला.
 • उच्च शिक्षण आणि व्यवसायाशी संबंधित लोकांकडे लक्ष गेले. हजारो व्यावसायिक भारतातून अमेरिकेत पोहोचू लागले. शिकण्यास गेलेल्यांना ग्रीन कार्ड किंवा इमिग्रेशन व्हिसा मिळाला. त्यानंतर, हजारो नातेवाईकांना या प्रणाली अंतर्गत अमेरिकेत येण्याची परवानगी देण्यात आली.

90 च्या दशकात आली दुसरी लाट

 • भारतीयांची वेगळी मोठी लाट 90 च्या दशकाच्या अखेरीस आली. तेव्हा Y2K बग ठीक करण्यासाठी कंप्यूटर प्रोफेशनल्सची खूप गरज पडली. Y2K एक व्हायरस होता, ज्याने नवीन दशक सुरू झाल्यावर हजारो कंप्यूटर सिस्टमसाठी धोका निर्माण केला होता.
 • यामध्ये जास्तीत जास्त जणांसाठी H1-B अस्थायी वर्क व्हिजा हा मार्ग बनला. टेक्नॉलॉजीमध्ये आपली विश्वासार्हता निर्माण झाल्यानंतर इतर अनेक भारतीय याच व्हिजावर अमेरिकेच्या दिशेने निघाले. अनेक हजार लोकांना ग्रीन कार्ड मिळाला.

कमाई आणि शिक्षणात अमेरिकनपेक्षा दुप्पट पुढे

सध्याच्या काळात जवळपास 31.80 लाख भारतीय वंशाचे लोक अमेरिकेचे नागरिक आहेत. 32% अमेरिकनच्या तुलनेत 72 टक्के भारतीय प्रवासींकडे ग्रॅज्यूएशन किंवा यापेक्षा मोठी डिग्री आहे. भारतीयांची एव्हरेज अॅनुअल इनकम 1,00,000 डॉलर म्हणजेच जवळपास 73 लाख रुपये आहे. ही अमेरिकन कुटुंबांच्या तुलनेत दुप्पट आहे.

तीन सेक्टरमध्ये प्रभाव
तीन असे सेक्टर आहेत, जेथे भारतीय-अमेरिकींचा सर्वात जास्त प्रभाव आहे. यामध्ये मेडिकल, एज्यूकेशन आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा समावेश आहे.

मेडिकल : डॉक्टर, नर्स आणि एक्सपर्ट कोरोनाशी लढण्यात सर्वात पुढे आहेत. सर्जन जनरल-नॉमिनी विवेक मूर्ती थेट यापासून सुटका मिळवण्यासाठी पॉलिसी, अॅनालिसिस आणि सॉल्यूशन डेव्हलप करण्याची जबाबदारी निभावत आहेत.

80,000 पेक्षा जास्त भारतीय वंशाचे डॉक्टर अमेरिकेत एकूण डॉक्टरांच्या जवळपास 8 टक्के आहेत. 40,000 भारतीय मेडिकलचे शिक्षण घेत आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन (AAPI) चे अध्यक्ष सुरेश रेड्डी यांच्यानुसार देशात प्रत्येक सहा रुग्णांमधून एकाचे उपचार भारतीय डॉक्टर करत आहे.

एज्यूकेशन : अजून एक फील्ड अकॅडमिक्सची आहे. हायर एज्यूकेशनच्या जवळपास प्रत्येक इंस्टीट्यूटमध्ये भारतीय हे फॅकल्टी म्हणून आहेत. हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या बिझनेस स्कूलमध्ये श्रीकांत दातार आणि नितिन नोहरिया डीन म्हणून यशस्वी ठरले आहेत. माधव राजन शिकागो यूनिव्हर्सिटीचे बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये डीन आहेत. ईवी लीग हार्वर्ड कॉलेजचे हेड राकेश खुराना आहेत.

अमेरिकन विद्यापीठात तीन भारतीय शिक्षणतज्ज्ञांनी नोबेल पारितोषिक जिंकले आहे. त्यापैकी हरगोविंद खुराणा यांना वैद्यकीय, सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्र आणि अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील पुरस्कार प्राप्त झाला आहे. मंजुल भार्गव आणि अक्षय व्यंकटेश यांनी गणितासाठी फील्ड्स पदक जिंकले आहे.

हॉस्पिटॅलिटी: हॉस्पिटॅलिटी उद्योगात भारतीयांचेही वर्चस्व आहे. अमेरिकेतील प्रत्येक दोन हॉटेल्सपैकी एक मालक एशियन अमेरिकन हॉटेल ओनर्स असोसिएशनचा सदस्य आहे. ही संस्था या क्षेत्रातील भारतीयांचे प्रतिनिधित्व करते. यात 19,500 हून अधिक सभासद आहेत.

तंत्रज्ञान जगात सर्वात आघाडीवर

 • भारतीय-अमेरिकन लोक सिलिकॉन व्हॅलीचे चालक आहेत. हे स्थान जगातील तंत्रज्ञान इंजिन आहे. तीन मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचे नेतृत्व भारतीय-अमेरिकन करत आहेत.
 • गूगलचे बॉस सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टमध्ये सत्य नडेला आणि IBM मध्ये अरविंद कृष्ण हेड आहेत.
 • टेक्नॉलॉजी आणि दुसऱ्या सेक्टरमध्येही भारतीय इंटरप्रेन्योर्स काम करत आहेत. टेक सेक्टरमध्ये विनोद खोसला हे ना मोठे आहे. ते सनमायक्रो सिस्टमचे फाउंडर आहेत.
 • नॅशनल फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक पॉलिसीच्या एका रिपोर्टनुसार, एक बिलियन डॉलर व्हॅल्यूएशनची अर्ध्यापेक्षा जास्त यूनिकॉर्न कंपनीच्या फाउंडर मेंबरमध्ये भारतीयांचा समावेश आहे.
 • एक अंदाज आहे की, सिलिकॉन व्हॅलीमध्ये 2,00,000 पेक्षा जास्त भारतीय काम करतात.
 • सिलिकॉन व्हॅकीच्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशनचे सेंटर बनण्यापूर्वी मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर अमर बोस यांनी हाय अँड ऑडियो सिस्टम डेव्हलप केली. 1960 च्या दशकात त्यांनी आपली कंपनी बनवली होती.
 • हाय प्रोफाइल CEO मध्ये वेफेयरचे नीरज शाह, पेप्सिकोच्या इंदिरा नूई, मास्टरकार्डचे अजय बंगा, यूएस एयरवेजचे राकेश गंगावल यांचा समावेश आहे.

शिक्षणातही पुढे

 • सायन्स आणि स्पेलिंग बी स्पर्धांमध्ये जवळपास दहा वर्षांमध्ये भारतीय मुले वर्चस्व गाजवत आहेत. पाच भारतीय-अमेरिकन लोकांनी पुलित्झर पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये पत्रकारितेसाठी गोबिंद बिहारी लाल आणि गीता आनंद, फिक्शनसाठी झुम्पा लाहिरी, सिद्धार्थ मुखर्जी यांना नॉन फिक्शन आणि विजय शेषाद्री यांना कवितांसाठी पुरस्कार मिळाले आहेत.
 • कायद्याच्या क्षेत्रातही भारतीयांनी आपली ओळख निर्माण केली आहे. श्री श्रीनिवासन फेडरल कोर्ट ऑफ अपील्स फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाचे चीफ जज आहेत. सर्वोच्च न्यायालयानंतर हे सर्वात महत्वाचे न्यायालय आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा दावेदार देखील मानले जाते.

सर्वात जास्त दखल राजकारणात

 • वनिता गुप्ता यांना असोसिएट अटर्नी जनरल म्हणून अध्यक्ष इलेक्ट जो बिडेन यांनी नियुक्त केले आहे. नील कात्याल यांनी बराक ओबामा यांच्या कार्यकाळात कार्यवाह सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले.
 • अमेरिकन कॅबिनेटची सदस्य बनणारी निक्की हेली पहिली भारतीय ठरली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना कॅबिनेट रँक असलेल्या संयुक्त राष्ट्रामध्ये स्थायी प्रतिनिधी केले.
 • ट्रम्प प्रशासनात प्रभावी पदांवर असलेल्या भारतीयांमध्ये सीमा वर्मा, अजीत पई, मनीषा सिंग आणि राज शाह यांचा समावेश आहे.
 • आता बायडेन आणि हॅरिस यांच्याकडे किमान 21 भारतीय-अमेरिकन लोक महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्यापैकी नीरा टंडन, विनय रेड्डी, वेदांत पटेल, नेहा गुप्ता, रीमा शाह खास आहेत.
 • पहिले राष्ट्राध्यक्ष राहिलेले जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन यांनी देखील त्यांच्या कारभारात भारतीयांना महत्त्वपूर्ण पदे दिली.
 • दिलीपसिंग सौंद यांच्या निवडीनंतर 2004 पर्यंत कोणीही हाउस ऑफ रिप्रजेंटेटिव्ह निवडण्यात आले नाही. 2004 मध्ये बॉबी जिंदल हे निवडून आले होते.
 • त्याच्या आधी कनक दत्ता यांनी 80 च्या दशकात न्यू जर्सी स्टेट असेंबलीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी अभियान सुरू केले होते. यामध्ये त्या अपयशी ठरल्या.
 • कुमार बर्वे 1991 मध्ये मॅरीलँड आणि उपेंद्र चिवकुला 2001 मध्ये न्यू जर्सी स्टेट असेंबलीसाठी निवडले गेले होते.
 • दोन भारतीय बॉबी जिंदल लुइसियाना आणि निक्की हेली दक्षिण कॅरोलिनामध्ये गव्हर्नर निवडले गेले.
 • तीन डेमोक्रेट अमी बेरा 2010 मध्ये, राजा कृष्णमूर्ती, प्रमिला जयपाल आणि रो खन्ना 2017 मध्ये हाउस ऑफ रिप्रेझेटेटिव्हसाठी निवडले गेले.
 • हॅरिस यांना 2017 मध्ये सीनेटसाठी निवडण्यात आले होते. आता त्या व्हाइस प्रेसिडेंसची जबाबदारी सांभाळतील.
बातम्या आणखी आहेत...