आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत मंगळवारी एका 19 वर्षीय व्यक्तीने व्हाईट हाऊसजवळील सुरक्षा अडथळ्यावर ट्रक धडकावला. त्याला अटक करण्यात आली आहे. 'इंडियन एक्सप्रेस'नुसार- आरोपीची ओळख भारतवंशीय साई वार्षित कंडुला अशी झाली आहे. तो अमेरिकेतील मिसौरी येथे राहतो. न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, बॅरियरला आदळल्यानंतर साई ट्रकमधून बाहेर आला आणि नाझी झेंडा फडकावू लागला.
चौकशीदरम्यान त्याने सांगितले की त्याला सरकारवर नियंत्रण ठेवणारे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मारायचे होते. त्यासाठी सहा महिन्यांपासून त्याने नियोजन केले होते. सीक्रेट सर्व्हिसनुसार - कंडुलाने कायदेशीर कागदपत्रे देऊन व्हर्जिनियाहून हा ट्रक भाड्याने घेतला होता.
ट्रकमधून शस्त्रे सापडली नाही
आरोपीने व्हाईट हाऊसजवळील लाफायट स्क्वेअरच्या नॉर्थ बॅरियरला धडक दिली. कंडुला हा नाझी समर्थक आहे. चौकशीत, त्याने सांगितले की हिटलरचा त्याच्यावर खूप प्रभाव होता, कारण तो एक शक्तिशाली नेता होता. ट्रकमध्ये कोणतीही शस्त्रे किंवा स्फोटके सापडली नाही.
एक प्रत्यक्षदर्शी क्रिस जाबोजीने सांगितले की, ड्रायव्हरने बॅरियरला दोनदा धडक दिली होती. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जीन पियरे म्हणाले - घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष बायडेन व्हाइट हाऊसमध्ये होते. त्यांना घटनेची माहिती देण्यात आली.
अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
कंडुला याच्यावर राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्रपती किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जीवे मारण्याची धमकी देणे, अपहरण करणे आणि हानी पोहोचवणे यासह अनेक आरोप लावण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंडुलाने रात्री 8 च्या सुमारास सेंट लुईस ते डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. यानंतर त्याने विमानतळाजवळ ट्रक भाड्याने घेतला. येथून त्याने थेट व्हाईट हाऊस गाठले.
यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत
या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार - दोन वर्षांत कॅपिटल हिलजवळ बॅरिकेड्सवर वाहने आदळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. 6 जानेवारी 2021 रोजी, कॅपिटल हिंसाचारानंतर सुमारे तीन महिन्यांनंतर, एका कारने दोन कॅपिटल पोलिस अधिकाऱ्यांना धडक दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला.
या वर्षी ऑगस्टमध्येही एका व्यक्तीने आपली कार कॅपिटलजवळील बॅरिकेडमध्ये घुसवली होती. यानंतर कारने पेट घेतला. आरोपी रिचर्ड यॉर्कने कारमधून बाहेर येऊन हवेत गोळीबार केला. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.