आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत कार हल्ला की अपघात?:विस्कोन्सिनमध्ये ख्रिस्मस परेड दरम्यान भरधाव कारने अनेकांना चिरडले, 20 पेक्षा अधिक लोक जखमी

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील विस्कोन्सिन प्रांतात असलेल्या वुकेशा शहरात एका भरधाव कारने जमावाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास ख्रिस्मस परेड सुरू असताना ही घटना घडली. यामध्ये काही लोकांचा जीव गेला असून किमान 20 जण जखमी आहेत. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वुकेशा शहरातील पोलिस प्रमुख डॅनियल थॉम्पसन यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, घटनेतील SUV ताब्यात घेण्यात आली आहे. परंतु, यातील संशयित आरोपी ड्रायव्हर फरार आहे. घटनास्थळी सध्या परिस्थिती सामान्य आहे. परंतु, ड्रायव्हरने असे अपघाताने केले की लोकांना मारण्यासाठी त्याचा हा षडयंत्र होता याचा शोध घेतला जात आहे.

शहराचे मेयर शॉन रेली यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस, प्रशासन आणि माध्यमांनी धाव घेतली. या घटनेचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. त्यामध्ये भरधाव कार घुसताच सर्वत्र खळबळ दिसत आहे. कार इतक्या वेगाने घुसली की लोकांना पत्ताच लागला नाही.

स्थानिकांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस्मस परेडसाठी लोक मोठ्या संख्येने गोळा झाले होते. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी देखील मोठी गर्दी केली होती. शहरातील हे 58 वी वार्षिक परेड होती. रविवारी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 अशी परेडची वेळ होती. गेल्या वर्षी कोरोनामुळे परेड रद्द करण्यात आली होती. त्यामुळे, यावर्षी झालेल्या परेडमध्ये लोक मोठ्य़ा संख्येने सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...