आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत महिलेकडून कृष्णवर्णीय चालकाला शिवीगाळ:म्हटले - मी बॉस आणि तु नोकर; वर्णद्वेषी टिप्पणीचा VIDEO 30 लाख लोकांनी पाहिला

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत एका कॅब चालकावरील वर्णद्वेषी विधानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 24 तासांच्या आतच 30 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओत एक महिला कॅब चालकाला शिवीगाळ करताना दिसते. चालक या महिलेला वर्णद्वेषी विधान करू नको आणि तिथून निघून जा असे बोलताना दिसतो.

ट्विटरवर 30 लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. लोक महिलेविरोधात पोलिस कारवाईची मागणी करत आहेत.
ट्विटरवर 30 लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. लोक महिलेविरोधात पोलिस कारवाईची मागणी करत आहेत.

वॉशिंग्टनमधील ही संपूर्ण घटना समजून घ्या

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, ही घटना वॉशिंग्टनमधील आहे. यात महिला त्या चालकाला म्हणते - मी तुझी बॉस आहे. मी तुला नोकरीवर ठेवले आहे. तु नोकर आहेस. तु वेडा आहेस, तुला उपचार आणि औषधांची गरज आहे. महिला बराच वेळ त्या चालकावर ओरडताना दिसते. विरोध केल्यावर थोड्या वेळाने ती तिथून निघून जाते,

तथापि, हे स्पष्ट झालेले नाही की दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून वाद सुरु झाला होता. कॅब कंपनीने म्हटले आहे - या वर्णद्वेषी प्रकरणाची चौकशी केली जात आहे. कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपनीने यावर नाराजी व्यक्त केली आहे. अशी वर्तणूक योग्य नाही असे कंपनीने म्हटले आहे. वर्णद्वेषाविषयी आमच्या कंपनीची झिरॉ टॉलरन्स पॉलिसी आहे, आम्ही तपास करत आहोत असे कंपनीचे म्हणणे आहे.

यापूर्वीही वर्णद्वेषी हल्ल्याच्या घटना

यापूर्वी अमेरिकेच्या टेक्सासमधील प्लानो शहरातील एका रेस्टॉरन्टबाहेर चार महिला भारतीय शैलीत बोलत होत्या. तेव्हा एका मेक्सिकन-अमेरिकन वंशाच्या महिलेने त्यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी करत शिवीगाल केली. तिने एका भारतीय महिलेला थप्पडही मारली.

पोलंडमधील अमेरिकन व्यक्तीने भारतीयाला पॅरासाईट म्हटले

पोलंडमधील एका अमेरिकन व्यक्तीने भारतीय वंशाच्या व्यक्तीविषयी वर्णद्वेषी टिप्पणी करताना त्याला पॅरासाईट आणि जिनोसाईडर म्हटले. तर कॅलिफोर्नियातील फ्रेमॉन्ट शहरातील बेल रेस्टॉरन्टमध्ये एक भारतीय-अमेरिकन नागरिक दुसऱ्या भारतीयाला डर्टी हिंदू आणि डिस्गस्टिंग डॉग म्हणाला होता. तो त्याला 8 मिनिटांपर्यंत शिवीगाळ करत होता. यानंतर पोलिसांनी हेटक्राईमनुसार गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...