आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्ही नेहमीच म्हणत असतो की वय हा एक आकडा आहे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणत्याही वयात कोणतेही काम केले जाऊ शकते. अशीच प्रेरणादायी कहाणी अाहे सॅनफ्रॅन्सिस्को येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विजया श्रीवास्तव यांची.. त्या वयाच्या ६८ व्या वर्षी पोहणे शिकल्या. यापूर्वी त्या आपला वेळ नातीसोबत घालवत होत्या. त्यांना पोहण्याची गरजच वाटली नव्हती. पण या वयातही त्यांनी पोहण्याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर मात्र त्यांचे संपूर्ण आयुष्यच पालटून गेले. वाचा हे कसे घडले त्यांच्याच शब्दांत...
परिस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, दृढ मानसिक तयारी ठेवा, अपयशाची भीती दूर होईल : विजया
‘मी भारतातच शिकले-वाढले. कधीच स्विमिंग पूल, नदी वा तलावात पोहण्याची गरज वाटली नाही. अमेरिकेत आल्यानंतर तब्येत बिघडली तेव्हा उपचार सुरू झाले. एकदा डॉक्टरांनी तुम्ही स्विमिंग केले तर तब्येतीत चांगली सुधारणा होईल असे सांगितले. मी डॉक्टरांना विचारले की या वयात पोहायला शिकणे योग्य राहील? डॉक्टर म्हणाले, होय.. तुम्हाला व्यावसायिक प्रशिक्षणामुळे मदतच होईल. मी आणि माझी शेजारीण दोघींनी हायस्कूलमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकासोबत चर्चा केली असता तीही तयार झाली. पण यापूर्वी तिने कोणत्याही वृद्ध व्यक्तीला पोहणे शिकवले नव्हते. तिने आम्हाला आठवड्यात तीन दिवस ट्रेनिंग देणे सुरू केले. मी सकाळीच स्विमिंगसाठी जाऊ लागले. झोपही होत नव्हती. अंथरुणात स्विमिंग स्टेप करू लागले.
ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर मी गुगलवर शोधाशोध सुरू केली. यू-ट्यूबवर स्विमिंगचे व्हिडिओ बघत होते. पण ते पाहून संभ्रम व्हायचा. नंतर मुलीने मला टोटल इमर्शन स्विमिंग व्हिडिओविषयी सांगितले. यात एक व्यक्ती पोहण्याचे बारकावे सांगतो. यातूनही खूप मदत मिळाली. अनेक दिवस कमी खाेलीच्या पाण्यातच पोहत होते. परंतु ट्रेनरने मला दुसऱ्या टोकाला जाण्यास सांगितले. हिंमतच होत नव्हती. मात्र तिने बुडू देणार नाही असा विश्वास दिल्याने मी हेही करू शकले. माझा शेजारी अनेक दिवसांपासून माझा हा संघर्ष पाहत होता.
त्यानेही टाळ्या वाजवून माझे धैर्य वाढवले. माझी मुले, भाऊ, भाच्यांना माझा गर्व वाटतो. कारण या वयात कोणीच अशी जोखीम घेत नाही. उतारवयातील सर्वच लोकांना माझे सांगणे आहे की, कधीच स्वत:ला पराभव मानण्याचा पर्याय देऊ नका. मी कधीच परिस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. जर मानसिक तयारीने काही करण्यास सज्ज राहिलात तर अपयशी होण्याचे कारणच उरत नाही.-विजया
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.