आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेतील अलास्का राज्यातील उत्कियाविकमध्ये शुक्रवारी ६६ दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले. हा प्रकाशोत्सव तासाभरासाठी होता. ध्रुवीय क्षेत्रात गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला सूर्यदर्शन झाले होते. त्या दिवशी लोकांनी जल्लोष केला होता. शुक्रवारी दुपारी १.१६ वाजता (भारतात शनिवारी पहाटे ३.४५ वाजता) सूर्योदय झाला. सूर्याची तांबूस किरणे आसमंत व्यापून टाकणारी होती. लोकांसाठी हा उत्सव नसता तरच नवल.
लोक उन्हात भटकंतीसाठी निघाले. त्यांनी नृत्य करून आनंद व्यक्त केला. ४४०० लोकसंख्येच्या उत्कियाविक शहरात बहुतांश मेक्सिकोचे लोक वास्तव्यास आहेत. येथील ५८ वर्षीय क्रॅग म्हणाले, ६६ दिवसांपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही म्हणजे येथे अंधारच अंधार समजण्याचे कारण नाही. येथे सूर्य उगवतो, परंतु त्याचा प्रकाश या भागापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रात सायंकाळसारखे वातावरण असते. हे निसर्गाचे अनोखे रूप आहे. आम्ही ते वर्षानुवर्षांपासून पाहत आलो आहोत.
शहरातील लोकांना विजेचा दक्षता ठेवून वापर करावा लागतो. अंधाराच्या काळात (पोलर नाइट) लोक घरातच राहतात. चित्रपट पाहतात. गाणी ऐकतात. पुस्तकांचे वाचन करतात. ६६ दिवसांत येणारा नाताळचा सण सर्वाधिक रोमांचक वाटतो. लोक या काळात एकत्र येऊन नाताळ साजरा करतात. सर्वात लांब अंधाररात्र संपल्यानंतर लोक पारंपरिक एस्किमो नृत्य करतात. शाळा सुरू होते. तेथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ६६ दिवसांत येथे १०-१५ फूट बर्फ साचला जातो.
त्यामुळे अनेक संकटास तोंडही द्यावे लागते. पोलर नाइट संपल्यानंतर सूर्याच्या किरणांकडे लोक सकारात्मक प्रकाश म्हणून पाहू लागतात, असे क्रॅग यांनी सांगितले.
क्षितिजावर येत नाही सूर्य
अलास्का ध्रुवीय प्रदेश आहे. तो आर्क्टिक सर्कलच्या उंचीवर आहे. थंडीत सूर्य येथे क्षितिजावर येत नाही. त्याला पोलर नाइट संबोधले जाते. सामान्य दिवसांत येथील तापमान उणे ५ अंश सेल्सियस असते. पोलर नाइटच्या काळात तापमान उणे २० पर्यंत जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.