आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • USA | America | Wine | Alcohile | Marathi News | Alcoholic Beverages Other Than Wine Became Popular Among Young Americans; Inflation, Low Income And The Consequences Of Social Media

दिव्य मराठी विशेष:वाइनऐवजी इतर अल्कोहोलिक पेयांची अमेरिकी युवकांत आवड वाढली; महागाई, कमी उत्पन्न अन् सोशल मीडियाचा परिणाम

एरिक असिमोव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी वाइन उद्योगाच्या अहवालातील नोंदी, उत्पादकांसाठी अनाेखा मार्ग

वाइनऐवजी इतर अल्कोहोलिक पेयांची अमेरिकी युवकांत आवड वाढत चालली असल्याने अमेरिकेतील वाइन उद्योगाची चिंता वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मिलेनियल्सकडून वाइनचा कमी वापर. मिलेनियल्स म्हणजेच २३ ते ३८ वयोगटातील तरुण पिढी ज्यांच्यावर बाजाराचे लक्ष असते. अमेरिकेतील वाइन उद्योगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या वार्षिक अहवालात ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाइन उद्योगाचे प्रयत्न अपुरे आहेत, असे अहवालाचे लेखक रॉब मॅकमिलन यांचे मत आहे. बुमर्स (५७-७५ वयाचे) निवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या खर्चात झालेली कपात योग्यच आहे, पण या पिढीनेही या मार्गासाठी तयार असल्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.अमेरिकेच्या वाइन बाजारात दीर्घकाळ विश्लेषक असलेले रॉब यांनी पुढील दशक या उद्योगासाठी आव्हानात्मक असणार असे सांगून सावध केले आहे. या काळात वाइनची विक्री २० टक्क्यांनी कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. अहवालासाठी, रॉब यांनी २०२१ मधील ६०० पेक्षा जास्त कंपन्यांच्या आर्थिक विवरणांचे आणि विक्रीचे विश्लेषण केले.

त्यानुसार, मिलेनियल्सची क्रयशक्तीदेखील बुमर्सपेक्षा कमी आहे. तरुणांचा वाइनमधील रसही कमी झाला आहे. त्यांच्यावर विद्यार्थी कर्जाचे ओझे आहे. नोकरीच्या संधी कमी आहेत, ते घर घेण्याचा विचारही करत नाहीत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणांचाही अहवालात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकांना विचारण्यात आले की, पार्टीमध्ये वाइन, बिअर, स्पिरिट्स (धान्य, फळे, भाज्यांपासून बनवलेले अल्कोहोलिक पेय), फ्लेवर्ड माल्ट शीतपेये यामध्ये काय शेअर करायला आवडेल? ६५ पैकी ४९% जणांनी सांगितले की ते वाइन आणू इच्छितात, तर केवळ २१% मिलेनियल्सने सहमत दर्शवली. उर्वरित वयोगटातील केवळ ३० % लोकच त्यांच्या बाजूने होते. बिअर आणि स्पिरिटकडे कल वाढत आहे.

इकडे... भारतात २०२१ च्या अखेरच्या सहामाहीत विक्रीत १२ %वाढ
गेल्या वर्षीच्या शेवटच्या सहा महिन्यांत देशात मद्य आणि इतर मद्याच्या विक्रीत १२% वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी या उत्पादनांची कोविडपूर्वीच्या तिमाहीत जास्त प्रमाणात विक्री केली. कोविडदरम्यान घरांमध्ये वापर वाढला आहे. यानंतर, निर्बंध शिथिल केल्याने त्यात आणखी वाढ झाली. परिणामी विक्रीही वाढल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. लोक महागड्या ब्रँडची निवड करण्यास प्राधान्य देतात, असा कल दिसून आला आहे.

बातम्या आणखी आहेत...