आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • USA | Children Social Media Low In America | Marathi News | A Law To Prevent Children From Going On Social Media; A Tool To Disable Addictive Features

दिव्य मराठी विशेष:मुलांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नये म्हणून अमेरिकेत येणार कायदा; व्यसन लावणारी फीचर्स डिसेबल करण्यासाठी असेल टूल

वॉशिंग्टन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल प्लॅटफॉर्म्सवर निर्बंधांसाठी अमेरिकी खासदारांनी आणले ‘किड्स ऑनलाइन सेफ्टी बिल’

‘सोशल मीडियाचा नकारात्मक परिणाम मुले व किशोरांवर जास्त होत आहे. टेक दिग्गजांना काहीच चिंता नाही. त्यामुळे वेसण घालणे आवश्यक आहे...’ हे म्हणणे आहे अमेरिकी सिनेटर मार्शा ब्लॅकबर्न यांचे. रिपब्लिकन पार्टीच्या ब्लॅकबर्न आणि डेमॉक्रॅटिक सिनेटर रिचर्ड ब्लूमेंथल यांनी सोशल प्लॅटफॉर्म्सवर निर्बंधांसाठी ‘किड्स ऑनलाइन सेफ्टी अॅक्ट-२०२२’ सादर केला आहे. अलीकडेच अमेरिकी काँग्रेसने १६ वर्षांखालील मुलांवर सोशल मीडियाच्या परिणामांबाबत पाच सुनावण्या केल्या. त्याच आधारावर हे विधेयक आणले आहे. त्याला सर्वांचा पाठिंबा मिळेल, असा ब्लॅकबर्न यांचा दावा आहे. या विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे...

विधेयकातील ५ महत्त्वाचे मुद्दे... त्याद्वारे सोशल मीडिया कंपन्यांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जाईल
1. सर्वात मजबूत प्रायव्हसी पर्याय : सोशल मीडिया कंपन्यांच्या युजर्सना प्रायव्हसी पर्याय द्यावा लागेल. व्यसन लावणारे फीचर्स डिसेबल करण्यासोबतच पेज किंवा व्हिडिओ लाइक करण्यापासून ऑप्ट आऊट करण्याची सवलत असेल. तो आतापर्यंतचा सर्वात मजबूत प्रायव्हसी पर्याय आहे, तो डिफॉल्ट राहील.

2. टाइम ट्रॅकिंग : मुलांनी अॅपवर किती वेळ घालवला आहे हे पालकांना ट्रॅक करता येईल असे टूल्स अॅपमध्ये देणे अनिवार्य असेल. त्याद्वारे पालक मुलांच्या ऑनलाइन अॅप खरेदीवरही नजर ठेवू शकतील. त्याद्वारे ते मुलांचा अॅपचा वापरही नियंत्रित करू शकतील. हे सेटिंग्जही डिफॉल्ट असेल.

3. जबाबदारी निभावणे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अल्पवयीनांना होणारे नुकसान कमी करण्याच्या दिशेने सतत काम करावे लागेल. त्यात स्वत:ला नुकसान पोहोचवणे, आत्महत्या करणे, खानपानातील गडबड, अमली पदार्थांचा वापर, अल्पवयीनांसाठी दारूसारख्या प्रतिबंधित उत्पादनांवर आणि शोषण यांसारख्या मुद्द्यांवर फोकस गरजेचा आहे.

4. स्वतंत्र आढावा : मुले आणि किशोरांना प्लॅटफॉर्म्समुळे होणारे नुकसान, त्यांच्याशी संबंधित नियम-कायद्यांचे पालन आणि त्यांना रोखण्यासाठी कंपन्या पुरेशा प्रमाणात ठोस पावले उचलत आहेत की नाही, याचा आढावा घेण्यासाठी थर्ड पार्टीकडे जबाबदारी सोपवावी लागेल. पूर्ण प्रक्रिया निष्पक्ष राहावी हा हेतू आहे.

5. डेटा शेअरिंग : सोशल मीडिया कंपन्यांना मुले व किशोरवयीन युजर्सशी संबंधित डेटा शिक्षण, संशोधन संस्था, खासगी संशोधनकर्त्यांना शेअर करणे अनिवार्य असेल. या डेटाद्वारे सोशल मीडियामुळे मुलांच्या मानसिक-शारीरिक आरोग्याला होणारे नुकसान व ते रोखण्यासाठीच्या उपायांवर वैज्ञानिक अभ्यास करतील.

बातम्या आणखी आहेत...