आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कृष्णवर्णीय मृत्यू प्रकरण:अमेरिकेतील 25 शहरात कर्फ्यू; ट्रम्प यांचा आंदोलांना इशारा- 'आमच्याकडे प्राणघातक कुत्री आणि शस्त्रे आहेत'

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिनेसोटा राज्यातील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कृष्णवर्णीयाचा मृत्यू झाला
Advertisement
Advertisement

अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील मिनेपोलिस शहरात पोलिस कोठडीत कृष्णवर्णय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर 30 शहरात निदर्शने होत आहेत. अनेक शहरात शनिवारी रात्री पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. लॉस एंजिल्स, फिलाडेल्फिया आणि अटलांटासह 16 राज्यातील 25 शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलकांना इशारा देत म्हटले की, आमच्याकडे प्राणघातक कुत्री आणि शस्त्रे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत संपूर्ण अमेरिकेतून 1,400 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. निदर्शनाच्या दोन दिवसादरम्यान मिनेसोटामध्ये ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये 80% मिनेपोलिसमधील आहेत. मिनेसोटामध्ये गुरुवारी दुपारपासून शनिवारपर्यंत दंगल, चोरी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याच्या आरोपात 51 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील 43 मिनेपोलिसचे आहेत. निदर्शनादरम्यान, फिलाडेल्फियामध्ये 13 पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिस कमिश्नर डेनिएल आउटलॉ यांनी सांगितले की, निदर्शनादरम्यान पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. यानंतर 14 जणांना ताब्यात घेण्यात आले.

ट्रम्प म्हणाले- मी सर्वकाही पाहत होतो

आंदोलकांनी व्हाइट हाउसच्या बाहेर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात प्रदर्शन केले, त्यानंतर याला बंद करण्यात आले. शनिवारीदेखील आंदोलक व्हाइट हाउसच्या बाहेर जमा झाले. यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. दरम्यान, ट्रम्प यांनी व्हाइट हाउसची सुरक्षा करणाऱ्या अमेरिकेच्या सीक्रेट सर्विस अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

ट्रम्प म्हणाले, ‘‘व्हेरी कूल, मी आत होतो आणि प्रत्येक घटना पाहत होतो. मला खूप सुरक्षित वाटत होते. मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले, पण कोणीही फेन्स तोडण्यासाठी पुढे आला नाही. जर ते आत आले असते, तर त्यांचे स्वागत प्राणघातक कुत्री आणि शस्त्रांनी केले असते. ’’

या राज्यात होत आहे आंदोलन

कॅलिफोर्निया, कोलोराडो, फ्लोरिडा, जॉर्जिया, इलिनॉय, केंटकी, मिनेसोटा, न्यूयॉर्क, ओहायो, ओरेगन, पेंसिल्वेनिया, साउथ कैरोलिना, टेनेसी, उटाह, वॉशिंग्टन आणि विस्कॉन्सिन.

26 मे रोजी फ्लॉयडला अटक झाली होती

मिनेपोलिसमध्ये 26 मे रोजी फ्लॉयडला पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली होती. यापूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याने फ्लॉयडला रस्त्यावर पकडले होते आणि गुडघ्याने त्याच्या मानेवर 8 मिनीटापर्यंत दाब दिला होता. यादरम्यान फ्लॉयडच्या हातात हातकडी होती. याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यात 40 वर्षीय फ्लॉयड पोलिसांना आपल्या मानेवरील पाट काढण्याची विनंती करत आहे. काही वेळेनंतर त्यानची हालचाल बंद होते. त्यानंतर पोलिस त्याला गाडीत बसण्याचे सांगतो, पण त्याच्याकडून काहीच प्रतिक्रीया येत नाही. नंतर त्याला रुग्णालयात नेल्यावर त्याचा मृत्यू झालेला असतो.

Advertisement
0