आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल साक्षरतेला प्राेत्साहन:जपानमध्ये फ्लाॅपी डिस्कचा वापर, बंदीचे आदेश; नव्या तंत्रज्ञानासाठी सरकार आग्रही

टाेकियाेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान आघाडीवर आहे. परंतु येथील सरकारी कार्यालयात अजूनही फ्लाॅपी डिस्क व फॅक्स यंत्रांचा वापर केला जात आहे. जपानमध्ये आजही सुमारे १९०० हून जास्त सरकारी कामकाजासाठी व्यवहारात स्टाेअरेज डिव्हाइससारखे सीडी व मिनी-डिस्कचा वापर सामान्य आहे. जपानच्या डिजिटल विभागाचे मंत्री ताराे काेनाे यांनी फ्लाॅपी डिस्कच्या विराेधात लढ्याची घाेषणा करण्यात आली आहे. ते म्हणाले, नाेकरशहा मंडळींनी आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. फ्लाॅपी डिस्क-फॅक्सला हटवण्यासाठी जपान सरकारने अनेक प्रकारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यात खराब डिजिटल लिटरसी, जुन्या प्रशासकीय व्यवस्थेला बदलण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. पेपरवर लावल्या जाणाऱ्या सीलला देखील संपुष्टात आणण्यात आले. २०१९ मध्ये जपानचे सायबर सुरक्षामंत्री म्हणाले, मी कधीही संगणकाचा वापर केला नाही. संगणकाशी संबंधित काम कर्मचाऱ्यांवर साेपवताे.

फ्लाॅपीमध्ये डेटा सुरक्षित, अधिकाऱ्यांनी केला दावा जपान सरकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार फ्लाॅपीमध्ये डेटा जास्त सुरक्षित राहताे. त्यामुळे ते सरकारी कामकाजात ई-मेलचादेखील वापर करत नाहीत. गाेपनीय सरकारी दस्तएेवज फ्लाॅपी डिस्कवर सेव्ह केले जातात.

बातम्या आणखी आहेत...