आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य प्रसाधनांच्या गुणवत्तेवर सवाल:अनेक ब्रँडेड कंपन्यांकडून सिंथेटिक अन् हानिकारक घटकांचा वापर, यामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास

वॉशिंग्टन23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसवॉश असो वा नेल पॉलिश, सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यापूर्वी लोक त्याचा ब्रँड अवश्य पाहतात. तथापि, सर्व ब्रँडेड कंपन्यांची उत्पादने गुणवत्तापूर्ण असतील, याची कोणतीच हमी नाही. कारण प्रत्येक देशात सौैंदर्य प्रसाधनांसाठी वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यांचा फायदा या कंपन्या घेतात. जसे युरोपियन युनियनने सौंदर्य प्रसाधनांत १३०० घटकांच्या वापरावर बंदी घातली आहे, पण अमेरिकेने केवळ ११ घटकांवरच बंदी घातली. जगातील अशाच इतर देशांतही सौंदर्य प्रसाधनांसाठी वेगवेगळे नियम आहेत. अशा वेळी या कंपन्या स्थानिक नियमांचा हवाला देत आपल्या सौंदर्य प्रसाधनांत इतर देशांत बंदी असलेल्या हानिकारक घटकांचा वापर करतात. नंतर ही उत्पादने जगभरात विकतात.

आणखी एक समस्या आहे. ती म्हणजे सौंदर्य प्रसाधनांत सिंथेटिक किंवा इंजिनिअर्ड घटकांचा वापर होणे. संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेच्या अहवालानुसार, अनेक कंपन्या सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीत पर्यावरण रक्षणाच्या आडून सिंथेटिक वस्तूंचा वापर करत आहेत. कंपन्यांचे म्हणणे आहे की, जी नैसर्गिक उत्पादने कृत्रिम पद्धतीने तयार केली जाऊ शकतात त्यांचे नैसर्गिक उत्पादन वाढल्याने पर्यावरणावर अधिक ताण पडेल. यामुळे कंपन्या सैंदर्य प्रसाधनांत सिंथेटिक चंदनाचे लाकूड वापरण्यालाही योग्य ठरवतात. तथापि, सिंथेटिक किंवा इंजिनिअर्ड घटक असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यास खाज, जळजळ आणि अ‍ॅलर्जी होऊ शकते. दीर्घकाळ अशी उत्पादने त्वचा कोरडी करू शकतात. लाइफस्टाइल ब्रँड ग्रुपचे तलाती सांगतात, पर्यावरणावर काम करणारी संघटना स्किन डीपकडे ब्यूटी अँड स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या हानिकारक घटकांची यादी आहे. सौंदर्य प्रसाधन कंपन्या लिलियल (यूरोपीयन यूनियनमध्ये बंदी), पॅराबीन्स आदी अनेक हानिकारक घटकांचाही वापर करत आहेत. शेवाळ व सागरी सनस्क्रिन वॅगन लिपस्टिक व एक्सफोलिएटिंग साबण हे नैसर्गिक वस्तूंपासून तयार करण्यात आले, असे लोकांना वाटते. मात्र, कंपन्या या उत्पादनांमध्येही सिंथेटिक घटक किंवा इंजिनिअर्ड घटकांचा वापर सर्रासपणे करत आहेत.

क्लीन ईटिंगपासून सुरू झाला क्लीन ब्यूटी ट्रेंड, १२% दराने वाढतोय बाजार
संपूर्ण जगात क्लीन ब्यूटीचा ट्रेंड सुरू आहे. बहुतांश लोक क्लीन ब्यूटी प्रॉडक्टची मागणी करतात. त्यामुळे प्रत्येक कंपन्या आपले उत्पादन क्लीन ब्यूटी प्रॉडक्टच्या श्रेणीमध्ये आणू इच्छित आहेत. संशोधन कंसल्टन्सी ब्रँडइसेन्सचे म्हणणे आहे की, अमेरिकन बाजारात एकतृतीयांश उत्पादने क्लीन ब्यूटीअंतर्गत येतात. पुढील ५ वर्षांत याची १२% दराने वाढीची शक्यता आहे. ही टर्म कॅलिफोर्नियातून १९९० च्या दशकात आली. तेव्हा इथे क्लीन ईटिंगचा काळ सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...