आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रायलच्या ९० लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६०% लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या सर्वांगीण प्रभावाविषयी काही बोलणे घाई केल्यासारखे होईल; परंतु लसीकरणानंतर सुरुवातीला इस्रायलमध्ये महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जगातील मृत्यूंपेक्षा कमी आहे. इस्राइलमध्ये एकत्र केलेेल्या नवीन आकडेवारीनुसार फायझर-बायोटेक्निक लसीने कोविड -१९ ने जवळजवळ ९९% मृत्यू थांबले आहे. विषाणूचा प्रसार रोखला आहे.
इस्राइलची लसीकरण मोहीम चांगली सुरू झाली. केवळ दोन आठवड्यांत, १०% पेक्षा जास्त लोकांना लसीकरण झाले. त्या तुलनेत अमेरिकेला ५७ दिवस आणि ब्रिटनला हा टप्पा गाठायला ४५ दिवस लागले. इस्राइलमध्ये, प्रति १०० लोकांना लस देताना १०८ डोस लागले आहेत. फायझर लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. पण, वेग आता कमी होत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार जानेवारीत दररोज १.५% लोकांना पहिला डोस देण्यात आला. आता दररोज ०.२% डोस दिले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.