आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Vaccination Of 12 15 Year Old Children From Tomorrow In America, Approval To Pfizer Bioentech Vaccine

अमेरिका:12-15 वर्षांच्या मुलांचे उद्यापासून लसीकरण, फायझर-बायोएनटेकच्या लसीला मंजुरी

वॉशिंग्टन/नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाविरुद्धच्या लढाईतील हे मोठे पाऊल

अमेरिकेत १२ ते १५ वर्षांच्या मुलांचेही कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार आहे. त्यासाठी एफडीएने फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. त्यामुळे १३ मेपासून मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकेल.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या निर्णयानंतर सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईतील हे मोठे पाऊल आहे. कॅनडानेही फायझरच्या लसीला १२ वर्षांवरील मुलांसाठी मंजुरी दिली आहे. एफडीएच्या सेंटर फॉर बायोलॉजिक्स इव्हॅल्युएशन अँड रिसर्चचे संचालक पीटर मार्क्स म्हणाले, सीडीसीच्या सल्लागारांची गट बुधवारी बैठक घेईल. तीत लसीचा डोस देण्याबाबतची शिफारस करेल. गुरुवारपासून मुलांना डोस मिळण्यास सुरुवात होईल. भारतातही क्लिनिकल ट्रायलची केली शिफारस

भारतातही सीडीएससीओ समितीने भारत बायाेटेकच्या काेव्हॅक्सिन लसीची २ ते १८ वर्षांच्या मुलांवर क्लिनिकल ट्रायलची शिफारस केली आहे. त्याला डीसीजीआयची मंजुरी बाकी आहे. सीडीएससीओने भारत बायोटेकच्या लसीच्या थेट दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांची शिफारस केली. चाचण्यानंतर ४-५ महिन्यांत लस येऊ शकते. कंपनी ५२५ मुलांवर चाचण्या करेल.

बातम्या आणखी आहेत...