आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:अमेरिकेत लसीकरण मंदावले; डोस लवकर देण्याचे आव्हान

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केला विविध क्षेत्रांचा दौरा

अमेरिकेतील लसीकरणाच्या कालबद्ध कार्यक्रमाची पूर्तता होताना दिसून येत नसल्याने अध्यक्ष जो बायडेन यांनी संसर्गापासून दक्ष राहण्याबरोबरच लोकांना लवकरात लवकर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेने चार जुलैपर्यंत ७० टक्के वयस्करांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बायडेन यांनी संवाद साधला. त्यात बायडेन यांनी लसीकरणाच्या उद्दिष्टाबद्दल काहीही सांगितले नाही. वास्तविक कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा मे महिन्यात झाली होती. तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल, असा दावा केला होता. मात्र आता बायडेन यांच्या म्हणण्यानुसार कमी लसीकरण झालेल्या राज्यांत कोरोना वेगाने पसरतोय. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी शुक्रवारी लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी अटलांटाला भेट दिली होती. फुल्टन भागात लसीकरण योग्यप्रकारे झाले नाही. तेथील ५० टक्के लोकांनी कोरोनाचा एक डोस घेतला आहे. अशाच प्रकारे मानवी सेवा सचिव झेव्हियर बेसेरा यांनी कोलोराडोचा दौरा केला होता. तेथे लसीकरणात बरीच घट झाली आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन बायडेन यांना १५० दिवस लोटले आहेत. एवढ्या दिवसांत अमेरिकेत कोरोना लसीचे ३० कोटी डोस दिले आहेत.

अमेरिकेत कोरोना लसीकरणाचा वेग अचानक मंदावल्याचा परिणाम योजनेवर होऊ शकतो. अमेरिका गरजू देशांना लसीचे आठ कोटी डोस देईल, असे बायडेन यांनी जाहीर केले होते. परंतु या वचनाची पूर्तता करण्यासाठी बायडेन यांच्याकडे केवळ दोन आठवड्यांचा कालावधी राहिला आहे. आता अमेरिका अॅस्ट्राजेनेका लस परदेशात पाठवण्याच्या योजनेत काही सुधारणा करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. आधी फायझर, बायोएनटेक, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सनसोबत अॅस्ट्राझेनेकाची लसही गरजू देशांना दिली जाणार आहे.

चिंता का : आधी दरराेज पाच लाख डोस देत होते, आता दोन लाख
अमेरिकेच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने याबाबतची माहिती दिली. शुक्रवारपर्यंत देशात एक डोस घेतलेल्या वयस्करांचे प्रमाण ६५ टक्के आहे. परंतु अमेरिकेत दररोजच्या लसीकरणाचे प्रमाण घटले आहे. पूर्वी दररोज पाच लोकांना डोस दिले जात होते. आता ही संख्या दोन लाखांवर आली आहे. व्हाइट हाऊसने देखील याबद्दलची स्थिती जाहीर केली आहे. त्यानुसार व्हर्जिनिया, कोलोराडोसह १५ राज्यांत ७० टक्के वयस्करांनी कोरोनाचा एक डोस घेतला आहे. लुइसियानासारख्या आठ राज्यांत ४० टक्क्यांवर वयस्करांनी एक डोस घेतला आहे. अशीच स्थिती राहिल्यास अमेरिकेत पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.

जगभरात : ब्राझीलमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण, नवे मृत्यू

ब्राझीलमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. ९८ हजार १३५ एवढी ही संख्या असून हे प्रमाण जगभरात सर्वाधिक आहे. २ हजार ४४९ मृत्यूचीही नाेंद झाली आहे. जगभरात एकूण चार लाखांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७० टक्क्यांहून जास्त रुग्ण १० देशांतील आहेत. त्यात ब्राझील, भारत, रशिया, ब्रिटन व अमेरिकेचा त्यात समावेश आहे. स्पेनमध्ये ब्रिटनहून येणाऱ्या नागरिकांसाठी पाच दिवसांचे क्वाॅरंटाइन अनिवार्य करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...