आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीमुळे बदलली स्थिती:अमेरिकेत निम्म्या वयस्करांना डोस, युरोपात लॉकडाऊन उठणार; मोठ्या लॉकडाऊननंतर आयुष्य रुळावर

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीडीसीच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत 8.4 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले

अमेरिकेत अर्ध्या वयस्करांना कोरोना लसीचा कमीत कमी डोस देण्यात आला आहे. रोगनियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) आकडेवारीनुसार १८ वर्षांवरील १३ कोटी लोकांना एक डोस देण्यात आला आहे. ही संख्या वयस्करांच्या ५०.४% आहे, तर ८.४ कोटी लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही अमेरिका नव्या रुग्णांबाबत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत रोज सुमारे ८० हजार रुग्ण आढळत आहेत, तर सुमारे ९०० मृत्यू होत आहेत. याला कोरोनाचे रूप जबाबदार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कॅनडातही नव्या कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे.

दुसरीकडे युरोपातील अनेक देशांत स्थिती रुळावर येण्याचे संकेत आहेत. स्लोव्हाकियाने त्यांची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारपासून तेथे चर्च, वाचनालय, सलून, तलाव, प्राणिसंग्रहालय उघडण्यात आले. लोकांना फिरण्यासाठी बाहेर जाता येईल. ग्रीसने आता दुसऱ्या देशातून येणाऱ्या लोकांवरील बंदी काही प्रमाणात मागे घेतली आहे. आता युराेपियन युनियन, अमेरिका, ब्रिटन, यूएई, सर्बिया, इस्रायलमधून येणाऱ्यांना ग्रीसमध्ये आल्यावर क्वॉरंटाइन न होता ७२ तास जुना कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवावा लागेल. तसेच पोर्तुगालनेही देशात साडेसहा लाख लोकांचे लसीकरण झाल्याने लॉकडाऊनमध्ये सूट देणे सुरू केले आहे. सोमवारपासून तेथे शॉपिंग सेंटर, माध्यमिक शाळा, विद्यापीठ आणि इंडोर डायनिंग सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

चिंता - बांगलादेशात ३ दिवसांपासून प्रत्येक १४ मिनिटाला एक मृत्यू
बांगलादेशात गेल्या तीन दिवसांत १४ मिनिटात एकाचा मृत्यू होत आहे. रविवारी देशात १८ मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच मृत्यू होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या १०२ होती. शनिवार व शुक्रवारी दोन्ही दिवशी १०१ मृत्यू झाले. बांगलादेशात १०३८५ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

भारतात कोरोनाचे वाढते रुग्ण बघता हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. मंगळवारपासून ३ मेपर्यंत उड्डाणे स्थगित असतील. या महिन्यात विस्ताराच्या दोन उड्डाणात ५० प्रवासी बाधित आढळल्याने हाँगकाँग सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तान व फिलिपाइन्सची उड्डाणेदेखील रद्द करण्यात आली आहेत.

कामगिरी ः भूतानमध्ये १६ दिवसांत ९३% वयस्करांचे लसीकरण

भारताचा शेजारी देश भूतानने २७ मार्चनंतर सुमारे ९३ टक्के वयस्करांचे लसीकरण केले आहे. देशाची एकूण लोकसंख्या आठ लाखांपैकी ६२% ना लस दिली गेली आहे. भूतान पहिला देश हाेता, ज्याला भारताने लस भेट म्हणून दिली होती. वेगाने लसीकरण करण्यासाठी हेलिकॉप्टरने लस दुर्गम भागात पोहोचवण्यात आली. हिमालयीन देश असल्याने डोंगर आणि बर्फाळ भागात स्वयंसेवक ऑक्सिजन सिलिंडर आणि लस देण्यासाठी गावोगावी गेले. स्वयंसेवकांना एका ठिकाणी जाण्यासाठी १४ तास लागतात.

...आणि डोळे पाणावले; काही आनंदी, तर काही रडले
ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडदरम्यान ट्रॅव्हल बबल करार झाला आहे. आता लोक क्वॉरंटाइन न होता ये-जा करू शकतील. प्रतिबंध हटल्यानंतर अनेक कुटुंबे अनेक महिन्यांनी आपल्या लोकांना भेटली.

बातम्या आणखी आहेत...