आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Vaccination Updates: Pfizer Will Give 1 Crore Doses In July, But Want A Waiver From The Trial; News And Live Updates

भास्कर Original:फायझर जुलैमध्ये 1 कोटी डोस देणार, पण ट्रायलपासून सूट हवी; दावलेल्या लसीकरणाला फायझरचा बूस्टर डोस

न्यूयाॅर्क2 महिन्यांपूर्वीलेखक: मोहम्मद अली
  • कॉपी लिंक
  • ट्रायलला लवकर मंजुरी देऊच, लालफीतशाहीनेही अडवणूक नाही : सरकार
  • फेब्रुवारीत मंजुरीसाठी विलंब केल्याने कंपनीने अर्ज घेतला होता मागे

लसींबाबतच्या अटींवरून भारत सरकार व अमेरिकन कंपनी फायझर यांच्यातील वाद जवळपास संपल्यात जमा आहे. फायझरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, भारत सरकारने कायदेशीर संरक्षणासह अनेक नियमांत सवलत देण्याच्या कंपनीच्या मागणीवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच हा करार पूर्णत्वास जाण्याची आशा आहे.

फायझरने यंदा आॅक्टोबरपर्यंत भारतात ५ कोटी डोस पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. १ कोटी डोसची पहिली खेप जुलैत मिळेल. कंपनी ऑगस्टमध्ये १ कोटी, सप्टेंबरमध्ये २ कोटी व ऑक्टोबरमध्ये १ कोटी डोस पाठवेल. म्हणजे चार महिन्यांत भारताला ५ कोटी डोस मिळतील. कंपनीने भारत सरकारला सांगितले अाहे की, त्यांची लस १२ वा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांवरही प्रभावी आहेत. तथापि, त्यासाठी कंपनीला भारतात मुलांवर इमर्जन्सी ट्रायल करावी लागेल. यानंतर या वयोगटाचे लसीकरण करता येईल.

आशा : फायझर आणि मॉडर्ना भारतात उत्पादन सुरू करू शकतात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने पुढील वर्षी फायझरकडून १० कोटींवर डोस खरेदी करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही अमेरिकी कंपनी भारतात लस उत्पादनासाठी औषध निर्मात्या कंपन्यांशी चर्चा करत आहे. तिने हैदराबादच्या डॉ. रेड्डीजसह इतर अनेक लॅबशी चर्चा केली आहे. दुसरीकडे, भारतात उत्पादनासाठी मॉडर्ना कंपनीही सिप्लासह इतर लॅबच्या सतत संपर्कात आहेत.

मंजुरी : आपत्कालीन चाचणी लवकर, तेव्हाच वेळेवर येऊ शकेल लस
भारतात लस मंजुरीची दीर्घ प्रक्रिया आहे. त्यामुळे भारतात वेगाने मंजुरी मिळाली तरच जुलै-ऑगस्टपर्यंत लस पाठवू शकू, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीला भारतातील लोकांवर आपत्कालीन चाचणी करावी लागेल. कंपनी या चाचणीतून सूट मिळण्याची मागणी करत होती, न मिळाल्याने तिने फेब्रुवारीत अर्ज मागे घेतला होता. आता सरकारने म्हटले आहे की, त्यात लालफीतशाही आड येणार नाही. लवकर मंजुरी देऊ.

किंमत: एक डोस १२०० रुपयांचा, २ ते ८ अंशांत महिनाभर साठवणे शक्य
कंपनीने अॅडव्हान्स पेमेंटची अट ठेवली आहे. तथापि, किमतीचा खुलासा केला नाही. सूत्रांनुसार, कंपनीने बहुतांश देशांना १० कोटी डोस १.७ अब्ज डॉलरमध्ये (१२.३ हजार कोटी रु.) दिले आहेत. तोच दर भारतासाठीही असेल. या हिशेबाने ५ कोटी डोस ६ हजार कोटी रुपयांत पडतील. म्हणजे एक डोस सुमारे १२०० रु. त पडेल. लस २ ते ८ अंश सेल्सियसवर एक महिन्यापेक्षा जास्त काळापर्यंत साठवता येऊ शकेल.

कंपनीचा तर्क : यूकेत भारतीयांवर ट्रायल, तोच ग्राह्य धरावा
भारत सरकारशी चर्चेत फायझरने इमर्जन्सी क्लिनिकल ट्रायलपासून सूट मागितली आहे. कंपनीने तर्क दिला की फायझर लसीच्या क्षमतेची पडताळणी करण्यासाठी ब्रिटनच्या अारोग्य खात्याने नुकतेच एक अध्ययन केले होते. त्यात २६% लोक ‘भारतीय वा ब्रिटिश भारतीय’ होते. या अभ्यासातील निष्कर्षांनुसार फायझरची लस भारतीय वंशाच्या लोकांवरही चांगलीच प्रभावी आहे.

भारत सरकारसोबत या ३ अटींवर एकमत झाले
सरकार व फायझरचे चेअरमन तथा सीईओ अल्बर्ट बौर्ला यांच्यात ३ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संयुक्तपणे काम करण्याबाबत एकमत झाले आहे. यामुळे फायझरला इमर्जन्सी ट्रायलसाठी जलद मंजुरी मिळेल.

1. फायझरच्या लसीचे जर साइड इफेक्ट्स झाले आणि प्रकरण कोर्टात गेल्यास सरकार कंपनीला कायदेशीर संरक्षण देईल.

2. ट्रायलचे निष्कर्ष जर्नलमध्ये प्रकाशित करण्यास २ वर्षे लागतात. ते लवकर होतील. कंपनीला सूट हवी आहे.

3. फायझरच्या लसींची खरेदी केंद्राच्या माध्यमातून होईल, राज्यांच्या नव्हे.

देशात असतील ४ लसी
देशात आतापर्यंत कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. रशियाच्या स्पुटनिक व्हीचे डोसही जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशात दिले जातील. सुरुवातीला ती खासगी क्षेत्रांत उपलब्ध असेल आणि अपोलो हॉस्पिटलद्वारे दिली जाईल. जुलैपासून फायझरची लस येईल.

काेराेना उपचार : झायडस कॅडिलाने अँटिबॉडी कॉकटेलच्या मानवी चाचणीची मागितली मंजुरी
नवी दिल्ली | झायडस कॅडिला कंपनीने केंद्राकडे मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलच्या (मिश्रण) मानवी वैद्यकीय चाचणीची मंजुरी मागितली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी गुरुवारी सांगितले की, आम्ही डीजीसीआयकडे यासाठी अर्ज केला आहे. झेडआरसी-३३०८ कॉकटेल कोरोनाच्या कमी गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अभ्यासात ते सुरक्षित आढळले आहे.’

बातम्या आणखी आहेत...