आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस:तिसऱ्या चाचणीपूर्वी लसीचा दावा धोकादायक : डब्ल्यूएचओ, रशियाच्या लसीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रश्नचिन्ह

पॅरिसएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियाची लस इतक्या लवकर कशी तयार झाली : ब्रिटनला संशय

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) रशियाने तयार केलेल्या कोरोनाच्या लसीवर अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या आहेत. संघटनेचे प्रवक्ता क्रिस्टियन लिंडमियर यांनी पत्रकारांना सांगितले, जर एखाद्या लसीची तिसऱ्या टप्प्यात चाचणी केल्याशिवाय त्याचे उत्पादन करण्यासाठी परवाना देण्यात येत असेल, तर ते धोकादायक आहे. डब्ल्यूएचओने म्हटले, रशियाने लस तयार करण्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केलेले नाही. त्यामुळे लसीच्या यशावर विश्वास करणे खूप कठीण आहे. लस उत्पादनासाठी अनेक मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. ज्या टीम असे संशोधन करत आहेत, त्यांना याचे पालन करावेच लागेल. अलिकडेच रशियाने लसीवरील सर्व क्लिनिकल चाचणी पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले होते की, येत्या दहा ऑगस्ट रोजी आम्ही याची घोषणा करणार आहोत. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकांना याचा वापर करण्याच्या घोषणेचा समावेश होता.

रशियाचे दाव्यावर प्रश्नचिन्ह : जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या वेबसाइटवर क्लिनिकल चाचणीतून जाणाऱ्या २५ लसीची यादी तयार केली आहे. १३९ लस वैद्यकीय पूर्व टप्प्यावर आहेत. रशियाने ऑक्टोबरमध्ये लस लोकांना देण्याबाबत जाहीर केले होते.

सर्व टप्प्यांची चाचणी पूर्ण करणे आवश्यक, तेव्हाच फायदा कळेल
क्रिस्टियन लिंडमियर यांनी सांगितले, लस परिणामकारक होण्याचे संकेत मिळणे आणि क्लिनिकल चाचणीच्या सर्व टप्प्यांतून जाण्यात खूप फरक आहे. आम्ही अधिकृतरित्या तसे काही पाहिले नाही. तसे काही असते तर युरोपातील आमच्या सहकाऱ्यांनी याकडे आवर्जून लक्ष दिले असते. एक सुरक्षित लस तयार करण्यासाठी अनेक नियम व मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली. याचे पालन करणे खूप आवश्यक आहे. या प्रक्रियेतून एखाद्या उपचाराचे अथवा लसीचे दुष्परिणाम अथवा याचा फायदा होण्याऐवजी नुकसान तर जास्त होत नाही ना, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

रशियाची लस इतक्या लवकर कशी तयार झाली : ब्रिटनला संशय
कोराेनाचा सर्वाधिक प्रभाव झालेल्या अमेरिकेने रशियाची लस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अमेरिकेचे साथरोग तज्ञ अँथनी फॉसी यांनी म्हटले, आम्ही रशिया व चीन दोघांचीही लस घेणार नाही. कारण दोन्ही देशांनी पारदर्शकता पाळलेली नाही. तर ब्रिटनने बुधवारी रशियाकडून लस विकत घेणार नसल्याचे म्हटले. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, इतक्या गतीने चाचणी व मंजुरी प्रक्रियेच्या अर्जावर ब्रिटनला संशय आहे. सर्व मोठे उत्पादक पुढील वर्षी लस तयार होणार असल्याचे सांगतात तर रशियाची लस बाजारात लवकर येऊ कशी शकते.

बातम्या आणखी आहेत...