आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रशियाच्या पुढे गेला चीन:अप्रूव्हलपूर्वीच चीनमध्ये व्हॅक्सीनच्या वापराला मंजुरी, हाय रिस्क झोनमधील लोकांना दिला जाईल पहिला डोज

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने आपल्या व्हॅक्सीन मॅनेजमेंट कायद्याचा हवाला देत, व्हॅक्सीन देण्यास मंजुरी दिली आहे

चीनने अप्रूव्हलपूर्वीच व्हॅक्सीनच्या वापराला मंजुरी दिली आहे. हे व्हॅक्सीन चीनमधील एका कंपनीने तयार केली आहे. एका चीनी अधिकाऱ्याने सांगितले की, व्हॅक्सीन मॅनेजमेंट कायद्याअंतर्गत या व्हॅक्सीनच्या वापराला मंजुरी दिली आहे. या कायद्यानुसार, मंजुरी मिळण्यापूर्वी हाय रिस्क झोनमधील रुग्णांना व्हॅक्सीन दिली जाऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये जुलै महिन्यापासून व्हॅक्सीन दिली जात आहे. यापूर्वीच रशियाने 'स्पुतनिक-वी' व्हॅक्सीनचा तिसरा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच रजिस्टर केली. याशिवाय व्हॅक्सीनच्या एक्सपोर्टची तयारीदेखील केली.

व्हॅक्सीनच्या इमरजंसी वापरासाठी चार प्लॅन बनवले

चीनमध्ये कोरोना व्हॅक्सीन डेव्हलेपमेंट टास्क फोर्सचे हेड झेंग झोंगवेने म्हटले की, व्हॅक्सीच्या इमरजेंसी वापराला मंजुरी दिली आहे, पण यासाठी बचावाची योजनादेखील तयार आहे. आम्ही यासाठी अनेक प्लॅन तयार केले आहेत. यात चार गोष्टी महत्वाच्या आहेत.

पहिला: लोकांच्या परवानगी नंतरच व्हॅक्सीन दिली जाईल.

दुसरा : साइड इफेक्ट रोखण्यासाठी सतत मॉनिटरिंग केली जाईल.

तिसरा : जर साइडइ इफेक्ट झाल्यास, तात्काळ उपचार केला जाईल. चौथा : कम्पनसेशन प्लॅनअंतर्गत नुकसान भरपाई केली जाईल.

दावा- एका महीन्यापूर्वी व्हॅक्सीनची इमरजेंसी लॉन्चिंग झाली

झोंगवेनुसार- एका महीन्यापूर्वी 22 जुलैला अधिकृतरित्या कोव्हिड-19 व्हॅक्सीनला इमरजेंसी वापरासाठी लॉन्च केले होते. यादरम्यान ट्रायल सरूच राहिले. ज्या लोकांना व्हॅक्सीनचा पहिला डोज दिला, त्यातील काही लोकांमध्ये हलके रिअॅक्शन दिसले. परंतू, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

आता ट्रायल पेरू, मोरोक्को आणि अर्जेंटीनामध्ये होईल

व्हॅक्सीन तयार करणारी चीनी कंपनी सिनोफार्मने गुरुवारी आणि शुक्रवारी ट्रायलच्या करारावर स्वाक्षरी केली. यानुसार, सिनोफार्मच्या व्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल पेरू, मोरोक्को आणि अर्जेंटीनामध्ये लवकरच सुरू होईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser