आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पेशावरहून भास्करसाठी रिफतुल्लाह ओरक्जई
वसंत पंचमी भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे सध्या पेशावरच्या बाजारांत उत्साह आहे. लोक मुलांसाठी नवे कपडे तसेच सुकामेवा, पिवळे तांदूळ खरेदी करत आहेत. पेशावरमधील हिंदू नेते हारुण सरब दयाल यांनी सांगितले,“देशाच्या विविध भागांत अनेक आठवडे आधीच वसंत पंचमीची तयारी सुरू होते. मुले रंगीत तर ज्येष्ठ नागरिक आणि महिला पिवळे कपडे घालतात. पिवळ्या खिरीसह अनेक पदार्थ बनवले जातात.’ पाकमध्ये पेशावर आणि पंजाब प्रांतात वसंत पंचमी हा प्रमुख सणांपैकी एक. पेशावरमध्ये ७० हजारपेक्षा जास्त हिंदू राहतात. प्राचीन मंदिरेही आहेत.
पेशावरच्या प्राचीन मंदिराचे पुजारी शकील कुमार यांनी सांगितले की,‘हिंदू लोक पिस्ता, बदाम, काजू यांचे बॉक्स तयार करतात, खास हक्वा मिठाई तयार करतात आणि ते बॉक्स शेजाऱ्यांना भेट म्हणून देतात.’ पेशावरचे झुबैर इलाही सांगतात, ‘वसंत पंचमीला आम्ही हिंदू मित्रांच्या घरी जातो. जेवण करतो आणि रात्रभर चालणाऱ्या उत्सवात सहभागी होतो. घरोघरी यात्रेसारखे चित्र असते.’ लाहोर येथील हिंदू शिक्षक खेत कुमार म्हणाले,‘यानिमित्त घरोघरी ज्ञान, कला आणि संगीताची देवी सरस्वतीची विशेष पूजा करतात. मोठ्या डिनर पार्ट्या, नृत्य कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, पतंगोत्सवासारखे उपक्रम पुन्हा सुरू केले जावेत, अशी आमची सरकार व नागरी संघटनांकडे मागणी आहे.’
या उत्सवाला आंतरराष्ट्रीय उत्सवाचा दर्जा होता
लाहोरचे पत्रकार फुर्खान जन सांगतात,‘वसंत पंचमीच्या रात्री मुस्लिम कुटुंबेही डान्स पार्टी करतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत वसंत पंचमीला आंतरराष्ट्रीय उत्सवाचा दर्जा होता. शहर रंगीत झेंड्यांनी सजायचे. रात्री होणारा पतंगोत्सव पाहण्यासाठी विदेशातून लोक येत असत. सायंकाळ होताच छतांवर सर्च लाइट लागायचे. काही अपघातांमुळे २००७ पासून सर्वोच्च न्यायालयाने पतंगोत्सवावर बंदी घातलेली आहे.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.