आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:मुलांसाठी फायझरच्या कोरोनालसीला पुढील आठवड्यात मंजुरी शक्य

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एफडीए घेणार निर्णय, पुढील शैक्षणिक सत्राआधी डोस उपलब्ध होण्याची आशा

अमेरिकेत अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी फायझर कंपनीच्या कोरोना लसीला पुढील आठवड्यात मंजुरी देण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधी या लसीचे अनेक डोस उपलब्ध होतील.

फायझरच्या लसीचे पूर्ण नाव फायझर-बायोटेक कोविड-१९ व्हॅक्सिन आहे. कंपनीने यंदा मार्चच्या अखेरीस १२ ते १५ वर्षे वयोगटातील २,२६० अमेरिकी स्वयंसेवकांवरील चाचण्यांचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर केले होते. यानंतर कंपनीने ही लस संपूर्णपणे प्रभावी असल्याचा दावा केला होता. अमेरिकेच्या फायझरच्या लसीला १६ वर्षांवरील तरुणांवर वापरास आधीच मंजुरी देण्यात आलेली आहे.

मॉडर्नाची लहान मुलांवरील लसही जुलैअखेरपर्यंत शक्य जुलैअखेर १२ ते १७ वर्षांच्या मुलांसाठी लस तयार करण्यात यश मिळेल, असा विश्वास मॉडर्ना कंपनीनेही व्यक्त केला. एफडीएने फायझर व मॉडर्नाला ११ वा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीचे अध्ययन करण्यास सांगितलेले आहे. भारतातही पुढील काही महिन्यांत या दोन्ही कंपन्यांच्या लसी मिळण्याची आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...