आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक लिओनेल मेस्सीला कोरोनाची लागण झाली आहे. मेस्सी फ्रेंच फुटबॉल लीग 1 मध्ये पॅरिस सेंट जर्मेन (PSG) क्लबकडून खेळत आहे. 34 वर्षीय मेस्सी आणि क्लबच्या इतर 3 खेळाडूंचा कोविड-19 अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. क्लबने याला दुजोरा दिला आहे.
पीएसजीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मेस्सीशिवाय डिफेंडर जुआन बर्नेट, बॅकअप गोलकीपर सर्जियो रिको आणि मिडफिल्डर नॅथन बिटुमाझाला यांचे कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहवाल येण्यापूर्वी क्लबला सोमवारी फ्रेंच चषकातील 32 ची फेरी खेळण्यासाठी व्हॅन्स क्लबसोबत प्रवास करावा लागला. मात्र आता हे चार खेळाडू संघासोबत जाणार नाहीत.
स्पॅनिश लीग क्लब बार्सिलोनाबरोबर 15 वर्षांची साथ सोडून मेस्सीने यावर्षी ऑगस्टमध्ये पीएसजीमध्ये प्रवेश केला. मेस्सीने क्लबसाठी आतापर्यंत 16 सामन्यांमध्ये 6 गोल केले आहेत. मेस्सीच्या शानदार खेळामुळे PSG सध्या लीग 1 मध्ये 19 सामन्यांतून 46 गुणांसह आघाडीवर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.