आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी संयुक्त राष्ट्राला पहिल्यांदाच संबोधित केले. संयुक्त राष्ट्र आयोगाच्या ६५ व्या सत्रात बुधवारी त्या म्हणाल्या, लोकशाहीचे स्वरूप मूळ रूपात महिलांच्या सबलीकरणावर अवलंबून आहे. परंतु निर्णय प्रक्रियेतून महिलांना दूर ठेवणे लोकशाहीतील उणिवा दर्शवणारी गोष्ट आहे, असे हॅरिस यांनी सांगितले.जगभरात महिलांच्या पातळीवर लोकशाही व स्वातंत्र्य यांचे अध:पतन झाल्याबद्दल चिंता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, लोकशाहीवर दबाव वाढत चालला आहे, हे आपण जाणतो. गेल्या १५ वर्षांत जगभरात स्वातंत्र्याचा संकोच झालेला आपण पाहत आहोत. लोकशाही व स्वातंत्र्याच्या दृष्टीने गेले वर्ष अतिशय वाईट होते, असे तज्ञांना वाटते. खरे तर महिलांचा सहभाग हा लोकशाहीला बळकट करतो. त्याहून महत्त्वाचे म्हणजे महिलांची स्थिती म्हणजे लोकशाहीची स्थिती होय. अमेरिका दोन्ही गोष्टींना बळकट करण्याचे काम करेल. कोविड-१९ जागतिक महामारी आहे. त्यामुळे आर्थिक सुरक्षा, शारीरिक सुरक्षा व महिलांच्या आरोग्याची त्यातून हानी झाली, असे त्यांनीसांगितले.
प्लास्टिक धोरणावर हॅरिस यांच्या पाठिंब्याची मागणी
उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांनी मंगळवारी डेन्वर येथील छाेट्या व्यावसायिकांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यात भारतवंशीय अमेरिकी व्यावसायिक ललिता चित्तूरही सहभागी झाल्या हाेत्या. त्यांनी हॅरिस यांच्याकडे प्लास्टिक धाेरणाचे समर्थन करण्याचे आवाहन केले. ललिता आयात व्यवसायाशी संबंधित आहेत. त्याशिवाय विधवा महिलांना मदत करण्याचे देखील त्या काम करतात. इकाे आॅल ट्रेडिंग एलएलसीच्या त्या मालक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.