आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऑफिसमध्ये बुलिंगला बळी पडलेल्यांचा कारस्थानावर विश्वास, बुलिंग करण्याविरुद्ध ते कट रचत असतात

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑफिसमध्ये अनेकदा लोक बुलिंगला(चिडवणे, खिजवणे) बळी पडतात. कधी-कधी तर ते असे पाऊल उचलतात ज्याचे परिणाम अन्य लोकांनाही भोगावे लागतात. ब्रिटनच्या नॉटिंगहॅम विद्यापीठ झालेल्या एका संशोधनात चकित करणारी बाब दिसली. संशोधनानुसार, बुलिंगला बळी पडलेले लोक षडयंत्रावर जास्त विश्वास ठेवतात. ते अनेकदा जाणीवपूर्वक कार्यालयात असे वातावरण तयार करतात ज्याद्वारे बुलिंग करणाऱ्यांना त्रास व्हावा. अनेकदा त्यांच्याविरुद्ध कटही करतात. ब्रिटनचे नॉटिंगहॅम विद्यापीठ आणि फ्रान्सच्या नॅनटेरे विद्यापीठातील संशोधकांनी ऑफिस बुलिंगशी संबंधित मानसशास्त्रीय कारणांचा अभ्यास केला. त्यात दिसले की, ऑफिसमध्ये ७५% लोक बुलिंगला बळी पडतात. ते निराश भावनेने त्रस्त होतात. प्रमुख संशोधक डॅनियल ज्योली यांनी सांगितले की, बुलिंगचा अनुभव पीडितावर अनेक प्रकारचा परिणाम करतो. याचे अनेकदा गंभीर परिणामही समोर येतात. कार्यालयात एकमेकांविरुद्ध गॉसिप करतात. हे सहन न झाल्याने लोक अनेकदा नोकरी सोडतात आणि बेरोजगार होतात. याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी काही लोकांवर आॅफिसमध्ये सहा महिन्यांपर्यंत बुलिंग आणि काहींना चांगल्या वातावरणात ठेवले. त्यात दिसले की, बुलिंगला बळी ठरलेल्या लोकांत चुकीची भावना नोंदवण्याची शक्यता जास्त होती.

ऑफिसचे वातावरण गढूळ होते, उत्पादकतेवर परिणाम ऑफिसमध्ये टर उडवणे, चिडवणे, खिजवल्यामुळे वातावरण गढूळ होते. याचा परिणाम बुलिंगला बळी पडलेल्यांवर पडतो. त्यांची उत्पादकता कमी होते. ते नैराश्यात राहतात कमी सृजनशील होतात हे संशोधनात दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...