आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Vietnam Covid Variant Latest News Update; Hybrid Of Strains Found In India UK, UK Corona Variant, Corona Variant Found In India

कोरोना व्हेरिएंट:व्हियतनाममध्ये आढळला हवेतून वेगाने पसरणारा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट

हनोई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा नवा व्हेरिएंट भारत आणि ब्रिटेनमध्ये सापडलेल्या B.1.617 स्ट्रेनशी मिळता-जुळता आहे

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान व्हियतनाममध्ये व्हायरसचा नवीन व्हेरिएंट आढळल्याचे समोर आले आहे. दावा करण्यात येतोय की, हा व्हेरिएंट हवेतून जास्त वेगाने पसरतो. व्हियतनामचे आरोग्य मंत्री गुयेन थान लॉन्गने सांगितले की, या व्हेरिएंटमध्ये सर्वात आधी भारत आणि ब्रिटेनमध्ये सापडलेल्या B.1.617 शी मिळते-जुळते स्टेरेन आहेत. शास्त्रज्ज्ञांनी नुकतंच, कोरोना संक्रमित व्यक्तींची जेनेटिक स्टडी केली. यात या नवीन स्ट्रेनची पुष्टी झाली. पहिले ब्रिटेन, दक्षिण आफ्रीका, ब्राझील आणि भारतात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने धुमाकुळ घातला आहे.

यापूर्वी व्हियतनाममध्ये सात व्हेरिएंट पसरले
कोरोनाचे हे व्हेरिएंट गळ्यातून वेगाने वाढतो आणि आसपासच्या परिसरात पसरतो. पण, या नवीन व्हेरिएंटचे किती रुग्ण सापडले आहेत, याची माहिती लॉन्ग यांनी दिली नाही. यापूर्वी व्हियतनाममध्ये कोरोनाचे सात व्हेरिएंट सापडले आहेत.

अनेक निर्बंध लावण्यात आले

लॉन्ग म्हणाले की, देशातील वाढत्या संसर्गामागे हा नवीन व्हेरिएंट असू शकतो. हा देशातील तीसपेक्षा जास्त भागांमध्ये पसरला आहे. या भागांमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमानंतर रुग्ण वाढल्याचे निदर्शनास आले, यानंतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. याशिवाय, अनेक मोठ्या शहरांमत गर्दी जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पब्लिक पार्क, रेस्तरॉ, बार, क्लब आणि स्पादेखील बंद आहेत.

लसीकरण सुरू

व्हियतनाममध्ये आतापर्यंत 6,908 कोरोना रुग्ण आढळले असून, 47 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक रुग्ण याच महिन्यात आढळले आहेत. 9.7 कोटी लोकसंख्या असलेल्या वियतनाममध्ये सध्या एस्ट्रोजेनेका-ऑक्सफोर्डची कोरोना व्हॅक्सीन दिली जात आहे. येथे आतापर्यंत 10 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. याशिवाय अमेरिकन कंपनी फायजरसोबत 3 कोटी लसींचा करार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...