आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनाशकारी वादळ:व्हिएतनाम लिम्फा चक्रीवादळाच्या विळख्यात; सुमारे 33 हजार घरांचे नुकसान

हनोई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेलिकॉप्टरद्वारे मच्छीमारांची सुटका

दक्षिणपूर्व आशियाई देश व्हिएतनाममध्ये लिम्फा या चक्रीवादळामुळे पूर आला आहे. अनेक भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण बेपत्ता झाले आहेत. सरकारनुसार, वादळामुळे ३३ हजार घरांचे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांमध्ये ३१ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. लांब समुद्रकिनाऱ्यामुळे व्हिएतनाममध्ये विनाशकारी वादळाचा आणि पुराचा धोका कायम आहे. वृत्तांनुसार, सुमारे ९.६० कोटी लोकसंख्येच्या व्हिएतनाममध्ये गतवर्षी पूर आणि भूस्खलनामुळे १३२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०७ जण जखमी झाले होते.

तज्ज्ञांनुसार, समुद्राच्या वर जमिनीप्रमाणे हवा असते. हवा नेहमी उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहत असते. हवेत उष्णता निर्माण झाल्यानंतर या ठिकाणांवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. मात्र पृथ्वी आपल्या कक्षेत भोवऱ्याप्रमाणे फिरत असते. यामुळेच हवा सरळ दिशेने न फिरता चक्राकार फिरायला लागते. यालाच चक्रीवादळ म्हणतात.

हेलिकॉप्टरद्वारे मच्छीमारांची सुटका
छायाचित्र क्वांग ट्राय या राज्यातील समुद्रकिनाऱ्यावरील आहे. येथे काही मच्छीमार अडकले होते. त्यांची कोस्टगार्डच्या पथकाने हेलिकॉप्टरद्वारे सुटका केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser