आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलोंगवे:बॉलीवूड चित्रपट ‘स्वदेश’ प्रमाणे आफ्रिकी तरुणाने उजळून टाकले गाव; 150 घरांना मिळतेय वीज

लिलोंगवे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २००४ मध्ये एक चित्रपट आला होता. नाव होते स्वदेश. त्यात अभिनेता शाहरूख खानने एनआरआय मोहन भार्गवची भूमिका केली होती. अनेक वर्षांनंतर मोहन मायदेशी परतल्यानंतर आपल्या संशोधनामुळे गावाला विजेने उजळून टाकले. चित्रपटातील त्या पात्राला आफ्रिकी देश मलावीत एका व्यक्तीने वास्तवात आणले.

१५ वर्षांपूर्वी २००६ मध्ये मलावीत दुर्गम योबे कोसी गावात वीज नव्हती. मुलांना मेणबत्तीत अभ्यास करावा लागायचा. गावातील २३ वर्षांच्या कोलरेर्ड कोसीने परिवर्तनाला सुरुवात केली. ४० किमी अंतरावरील झिंबा शाळेतून बारावी करून परतला तेव्हा गावात अंधार होता. त्याचा अंदाज होता की, घराजवळून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात सायकल इतका पॅडल मारल्याने वीज तयार होऊ शकते. त्याने घरातील भंगारातून डायनामो बनवला. त्याचे घर विजेने उजळल्याचे गावात पसरले. कोलरेर्डने सांगितले, आमच्याकडेही वीज आण असे मला गावकरी सांगू लागले. मी अभियांत्रिकी शिकलो नव्हतो, ना इलेक्ट्रिशियन म्हणून शिकलो होतो. टर्बाइनसाठी मी जुन्या फ्रिजचे कम्प्रेसर गावातून वाहणाऱ्या नदीत लावले. ही युक्तीही कामी आली आणि सहा घरे उजळली. पुन्हा भंगारात गेलेल्या यंत्रातून एक मोठे टर्बाइन गावाबाहेर लावले. बांबूच्या खांबावरून तार घेऊन जात वीज आता गावातील घरात जात आहे.

आता घरांसह आमचे आयुष्यही उजळत आहे : ग्रामस्थ
बगावकऱ्यांना वीज मोफत उपलब्ध होते. फक्त त्यांना प्लँटच्या देखरेखीसाठी एका घराला दरमहा ८० रुपये द्यावे लागतात. आता मिनी ग्रेड लावायचे आहे. ग्रामस्थ म्हणतात की, कोलरेर्डने गावच उजळून नाही टाकले तर आमच्या आयुष्यातही आशेचा उजेड आणला आहे.

बातम्या आणखी आहेत...