आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Violence Against Women, Girls, Increase In Sexual Exploitation Due To Major Changes In Climate; Danger Of Early Marriage

लैंगिक शोषणात वाढ:हवामानात मोठ्या बदलांमुळे महिला, मुलींविरोधात हिंसा, लैंगिक शोषणात वाढ; लवकर लग्नाचा धोकाही

लंडन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानातील बदलामुळे महिलांविरोधात घरगुती हिंसाचारात वाढ होत आहे. हा खुलासा नुकत्याच एका संशोधनातून झाला आहे. संशोधनात म्हटले आहे की, पूर, दुष्काळ, वादळ आदी आपत्तींनंतर महिला आणि मुलींविरोधात हिंसेसह लैंगिक शोषणाची प्रकरणे वाढली आहेत. द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित या संशोधनात ५ खंडांचा समावेश केला. संशोधन करणाऱ्या सायमन फ्रेजर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ सारा म्हणाल्या, ‘आपण हवामान बदलांचा विचार करतो तेव्हा काही कठोर गोष्टी आठवतात. मात्र, आणखी काही छुपे परिणामही आहेत. ते सहजपणे दिसत नाहीत किंवा त्यावर सहजपणे संशोधन करता येत नाही. त्यामध्ये लिंगआधारित हिंसेचा समावेश आहे.’

आर्थिक समस्या, सामाजिक अस्थिरता, खराब वातावरण आणि तणावामुळे हिंसेत वाढ होते. एका संशोधनात हेदेखील आढळले की, कॅटरिना वादळानंतर नव्या मातांना पुरुषांकडून मारहाण करण्याची शक्यता आठपट अधिक असते. दुष्काळ पडल्यानंतर शारीरिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी आणि स्त्री-हत्या आदी प्रकरणांतही वाढ झाल्याचे सहारा आफ्रिका उपखंडाशी संबंधित ५ संशोधनातून समोर आले. एक्स्ट्रीम वेदरच्या घटनांमुळे लोक तणावग्रस्त होऊन विस्थापित होऊ शकतात. नेहमी महिला-पुरुष असमानतेमुळे अशा हिंसेला चालना मिळते. उदाहरणार्थ, एक कुटुंब पुरानंतर खर्च कमी करण्यासाठी लवकरात लवकर आपल्या कुटुंबातील मुलीचे विवाह लावून देते.

एकटेपणाने मेंदूत बदल होतो, डिमेन्शियाचा धोकाही राहतो एकटेपणा काहींसाठी घातक ठरतो. हा खुलासा एका संशोधनातून झाला आहे. एकटेपणा मेंदूचे स्ट्रक्चर व कॉग्निशन बदलतो, असे न्यूरोलॉजीत प्रकाशित एका संशोधनातून समोर आले. यामुळे मेंदूच्या ज्ञान प्राप्त करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. या बदलामुळे वृद्धांत डिमेन्शियाचा धोकाही वाढतो. युवकांमध्येही स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा धोका २६% पर्यंत असतो.

बातम्या आणखी आहेत...