आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राष्ट्रपती जॅकब जुमा प्रकरण:आफ्रिकेत भारतीय-कृष्णवर्णीयांत हिंसक धुमश्चक्री; 10 जणांचा मृत्यू

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेत माजी राष्ट्रपती जॅकब जुमा प्रकरणात पुन्हा हिंसाचार उसळला. शनिवारी फिनिक्स शहरात भारतीय तसेच कृष्णवर्णीय समुदायांत हिंसक धुमश्चक्री पाहायला मिळाली. हिंसाचारात १० हून जास्त आफ्रिकन नागरिकांचा मृत्यू झाला. आफ्रिकन कृष्णवर्णीय समुदायाच्या संतप्त जमावाने भारतीयांवर हल्ला केला. भारतीयांच्या घर-वाहनांना पेटवून दिले. त्याची प्रतिक्रिया म्हणून भारतीयांनी बॅट, हाॅकी स्टिक, कुऱ्हाडी, हाताेड्याने हल्ला केला. या समुदायाने एक मिनी बस व टॅक्सी राेखून कृष्णवर्णीयांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत १० हून जास्त जणांचा मृत्यू झाला. तणावग्रस्त भारतीय समुदायाने फिनिक्सच्या रस्त्यांना बंद केले. ते आफ्रिकन लाेकांना शाेधून हल्ला करत आहेत.

आफ्रिकन कृष्णवर्णीय भारतीय समुदायावर हल्ला करू शकतात, असा इशारा काही दिवसांपासून साेशल मीडियावरून दिला जात हाेता. हिंसाचारानंतर क्वाजुलू प्रांताचे प्रीमियर सिहले जिकालाला म्हणाले, हल्ला झालेल्या ३६ लाेकांपैकी ३३ आफ्रिकन हाेते. पाेलिसांनी या प्रकरणात ५६ जणांना अटक केली आहे. अलीकडच्या काळात दक्षिण आफ्रिकेत भारत व स्थानिक समुदायात संघर्ष होण्याची ही पहिलीच वेळ आहे. वास्तविक भारत व आफ्रिकेतील संबंधाला मोठा इतिहास राहिला आहे. राजकीय, सामाजिक पातळीवर दोन्ही देशांत चांगले संबंध आहेत.

बातम्या आणखी आहेत...