आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया:लॉकडाऊनविरोधी निदर्शनात हिंसक धुमश्चक्री; 218 जण अटकेत, मारहाणीत 6 पोलिस जखमी

ऑस्ट्रेलिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियात कोरोनाचे नवे रुग्ण वाढू लागले आहेत. तेथे एका दिवसात आतापर्यंत विक्रमी रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे सिडनी, व्हिक्टोरिया, मेलबर्नसह अनेक भागात लॉकडाऊन सप्टेंबरपर्यंत वाढले आहे. या निर्णयाच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. ५१ लाख लोकसंख्येच्या मेलबर्नमध्ये लोकांनी लॉकडाऊन व सरकारविरोधी निदर्शने सुरू झाली आहेत. हजारो लोक रस्त्यावर आहेत. शनिवारी पोलिस व निदर्शकांदरम्यान हिंसक धुमश्चक्री उडाल्या. त्यात सहा पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेलबर्न पोलिस म्हणाले, मेलबर्न स्टेटमध्ये कोरोनाचे ७७ रुग्ण आढळून आल्यानंतर लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. लोकांचा त्यास विरोध आहे. आतापर्यंत २१८ निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. प्रत्येक निदर्शकावर सुमारे ३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात शनिवारी कोरोनाचे ८९४ रुग्ण आढळून आले. ही संख्या १९ महिन्यांतील सर्वाधिक आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने श्रीलंकेत १० दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...