आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
म्यानमारमध्ये एक फेब्रुवारीला झालेल्या सैन्य तख्तपालटानंतर सुरक्षा दलांनी शनिवारी आंदाेलकांच्या विराेधात सर्वात माेठी हिंसक कारवाई केली. या कारवाईत ९१ लाेकांना प्राण गमवावे लागले. अनेक लाेक जखमी झाले. याबराेबरच म्यानमारमधील आंदाेलनाला ५५ दिवस लाेटले आहेत. मृतांचा एकूण आकडा ४०० च्या घरात गेलाय.देशभरात निदर्शने सुरू असतानाच शनिवारी लष्कराने ७६ व्या सशस्त्र दल दिनाचा जल्लाेष साजरा केला. संकेतस्थळ म्यानमार नाऊनुसार सैन्य तख्तपालटाच्या विराेधात देशातील २४ हून जास्त शहरांत निदर्शने केली जात आहेत. देशाची सूत्रे लाेकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला साेपवण्याची मागणी आंदाेलकांनी केली आहे. आंदाेलनातून ही मागणी लावून धरण्यात आली आहे.
शनिवारी लष्कराने आंदोलकांवर समोरून गोळीबार केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी लष्कराने बेछूट गोळीबाराची कारवाई केल्याचे सांगितले. राजधानी नेपी तॉ मध्ये लष्कराने संचलन केले. त्यात लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. या दरम्यान लष्करी सरकार जुंताचे प्रमुख आँग यांनी तख्तपालट योग्य असल्याचे म्हटले. मागील स्यू की यांचे सरकार भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आमचे सरकार नि:पक्ष निवडणूक घेऊन सत्ता सरकारच्या ताब्यात देईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.