आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:2 वर्षीय मुलीवर माकडाचा हल्ला:माकडाने मुलीला पाय धरून जमिनीवर आपटले, अंगावर बसून चावले आणि नंतर...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका माकडाने 2 वर्षीय मुलीवर क्रूर हल्ला केल्याचा एक भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मुलगी इतर मुलांसमवेत आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी अचानक माकडाने तिच्यावर हल्ला केला.

यूके स्थित 'मेट्रो'ने आपल्या वृत्तात जखमी मुलीचे नाव पॉलिना व ती युक्रेनची असल्याचे म्हटले आहे. ही घटना रशियाच्या टेरपिगोरिएव्हो गावात घडली. तिथे पॉलिना आपल्या आई-वडिलांसमवेत त्यांच्या शेजारी व कौटुंबिक मित्रांकडे शरणार्थी म्हणून राहत आहे. या भागातील CCTV मध्ये कैद झालेला हा व्हिडिओ रेडिटसह विविध सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पॉलिना शिडीवर चढताना दिसून येत आहे. त्यावेळी अचानक एक माकड तिच्यावर हल्ला करते. तिला जमिनीवर पाडून चावा घेते.

2 वर्षीय चिमुरडीचे रडणे ऐकूण तिचे आई-वडील बाहेर धाव घेतात. तिची आई तिला उराशी पकडून घरात नेण्याचा प्रयत्न करते. पण त्यानंतरही माकड तिच्यावर हल्ला करणे सोडत नाही. ते तिच्या पायाला कडाडून चावा घेते.

यावेळी तिचे वडीलही माकडाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करतात. पण ते त्यांना चकवा देऊन पुन्हा पॉलिनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. तिचे वडील पुन्हा त्याच्यावर धावून जातात. त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. पण ते त्यांनाही घाबरवण्याचा प्रयत्न करते.

अखेर या व्हिडिओचा शेवट पॉलिना व माकडासह त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेताना होतो.

न्यूजविकने आपल्या वृत्तात हे माकड पॉलिना राहत असलेल्या कोट्यधीश मालकाचा असल्याचा दावा केला आहे. हा व्यक्ती पाळीव प्राणीसंग्रहालयाशी संबंधित असून, त्याच्याकडे लांडगे, हत्ती आदी वन्य प्राणी आहेत.

या घटनेत पॉलिनाच्या हात व पायावर खोलवर जखमा झाल्यात. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...