आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासत्तांमध्ये संघर्ष:जिनपिंग म्हणाले, तैवानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा हे आगीशी खेळण्यासारखे; तर बायडेन यांचा चीनला इशारा, कोविडबाबत पारदर्शकता ठेवा

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन जगातील सर्वात श्रीमंत देश, अमेरिकेला मागे टाकले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात सोमवारी रात्री विविध मुद्द्यांवर झालेली व्हर्च्युअल बैठक सुमारे चार तास चालली. या वेळी कुठलीही सहमती तर झाली नाहीच, पण तैवानवर दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी परस्परांना इशारा दिला. जिनपिंग म्हणाले,‘तैवानच्या स्वातंत्र्यावर कोणी सीमारेषा ओलांडली तर ते आगीशी खेळल्यासारखे होईल. चीन त्याविरोधात निर्णायक पाऊल उचलण्यास तयार आहे.’ दुसरीकडे, बायडेन यांनीही इशारा दिला की,‘आम्ही एक चीन हे धोरण मानतो, पण तैवानची सद्य:स्थिती बदलण्याच्या किंवा शांतता-स्थैर्य कमजोर करण्याच्या एकतर्फी प्रयत्नांना ठाम विरोध करतो.’

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या क्वाड या संघटनेचे नाव न घेता जिनपिंग म्हणाले,‘जगाची गटांत विभागणी हे नाशाचे कारण ठरू शकते. आपण शीतयुद्धाचे परिणाम पाहिले आहेत. बायडेन यांनीही कोविड मुद्द्यावर जिनपिंग यांना सुनावले की, महामारी रोखण्यात व तिच्या चौकशीत चीनला पारदर्शकता दाखवावी लागेल. बायडेन-जिनपिंग यांनी मानवाधिकार, व्यापार, हवामान बदलावरही चर्चा केली. त्यावर सहमती झाली नाही, पण दोघांनी सहकार्य वाढवण्याचे आश्वासन दिले. दोन्ही देशांतील स्पर्धेचे संघर्षात रूपांतर होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी उभय देशांची आहे, अशी टिप्पणीही बायडेन यांनी केली.

मानवाधिकारावर सल्ला दिल्यावर चीन म्हणाला- लेक्चर नको
व्हाइट हाऊसनुसार, बायडेन यांनी मानवाधिकार उल्लंघन आणि चीनच्या अनुचित व्यापार तसेच आर्थिक धोरणांवर चिंता व्यक्त केली. व्यूहात्मक मुद्द्यांचाही उल्लेख झाला. तो दोन्ही देशांच्या आण्विक धोरणाशी संबंधित आहे. मानवाधिकारांवर चीनने अमेरिकेला सांगितले की, आम्हाला इतर देशांचा हस्तक्षेप मंजूर नाही. इतर देश आम्हाला लेक्चर देऊ शकत नाहीत. उइगर आणि मुस्लिम अल्पसंख्यकांवरील अत्याचार आणि हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांवरील दडपशाहीबाबत चीनवर टीका होत आलेली आहे.

चीन जगातील सर्वात श्रीमंत देश, अमेरिकेला मागे टाकले
चीनने दोन दशकांत संपत्तीत सर्वात वेगाने वाढ केली आहे. २००० मध्ये त्याची एकूण संपत्ती ५२०.५९ लाख कोटी रु. होती, ती २०२० मध्ये ८,९२४.४० लाख कोटी रु. झाली. मॅकेंझी अँड कंपनीने जगातील एकूण उत्पन्नाच्या ६०% पेक्षा अधिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १० देशांच्या बॅलन्स शीटवरून हा अहवाल दिला आहे. याच काळात अमेरिकेची एकूण संपत्ती ६,६९३.३० लाख कोटी रुपयांनी वाढली.

बातम्या आणखी आहेत...