आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतीन-झेलेन्स्की G-20मध्ये एकत्र येणार:इंडोनेशियाच्या बालीमध्ये 15-16 नोव्हेंबरला परिषद; मोदी-बायडेनही सहभागी होणार

दुबई/जकार्ता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की पुढील महिन्यात जी-20 परिषदेच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार आहेत. ही परिषद इंडोनेशियाच्या बालीत 15 व 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. फेब्रुवारीत रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच या दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे अवघ्या जगाचे लक्ष्य लागले आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही जी-20 च्या बाली परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुढील जी-20 परिषद भारतात होणार असल्यामुळे याची शक्यता वाढली आहे.

युद्धाला तोंड फुटल्यानंतर विविध देशांच्या प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांना युद्धाला पूर्णविराम देण्याचे साकडे घातले. पण हे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरलेत.
युद्धाला तोंड फुटल्यानंतर विविध देशांच्या प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांना युद्धाला पूर्णविराम देण्याचे साकडे घातले. पण हे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरलेत.

झेलेन्स्की व पुतीन तयार

UAE च्या ‘द नॅशनल’ संकेतस्थळाने शुक्रवारी एक विशेष वृत्त दिले आहे. त्यात UAE तील इंडोनेशियाचे राजदूत हुसैन बागीस यांचा दाखला देत, पुतीन व झेलेन्स्की जी-20 परिषदेत सहभागी होणार असल्याचा दावा केला आहे. हुसैन यांना या परिषदेत रशिया व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार काय, असा प्रश्न केला असता त्यांनी 'होय, हे दोन्ही नेते बालीला येण्यासाठी तयार आहेत,' असे प्रत्युत्तर दिले.

संकेतस्थळाने याविषयी रशिया व युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधला. पण तेथून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. व्हाइट हाऊसने काही दिवसांपूर्वीच पुतीन जी-20 परिषदेसाठी येणार असतील तर झेलेन्स्की यांनाही बोलावण्यात आले पाहिजे, असे म्हटले होते.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही गुरूवारी पुतीन जी-20 परिषदेला आले तर त्यांची अवश्य भेट घेईल असे स्पष्ट केले होते. हुसैन यांच्या मते, पुतीन व बायडेन यांच्या भेटीसाठी खास तयारी सुरू आहे.

UAE तील इंडोनेशियाचे राजदूत हुसैन बागीस. बागीस यांच्या मते, पुतीन व झेलेन्स्की बालीत 15-16 नोव्हेंबरला होणाऱ्या जी-20 परिषदेला येण्यास तयार झालेत.
UAE तील इंडोनेशियाचे राजदूत हुसैन बागीस. बागीस यांच्या मते, पुतीन व झेलेन्स्की बालीत 15-16 नोव्हेंबरला होणाऱ्या जी-20 परिषदेला येण्यास तयार झालेत.

वेगवेगळ्या हॉटेलांत थांबणार झेलेन्स्की व पुतीन

हुसैन पुढे म्हणाले - आम्ही पुतीन व झेलेन्स्की यांची वेगवेगळ्या हॉटेलांत राहण्याची व्यवस्था केली आहे. इंडोनेशिया उर्वरित देशांहून वेगळा आहे. या देशात संपूर्ण गोष्टी शांतता व सद्भावनेने केल्या जातात.

या परिषदेत 2 पाहुणे देश आहेत. UAE व युक्रेन. दोघेही जी-20 चे सदस्य नाहीत. हुसैन म्हणाले- या देशांसोबत आमचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना समिटमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलेदिमीर झेलेन्स्की यांनी गत महिन्यातच संयुक्त राष्ट्रात बोलताना रशियाचा युक्रेनवरील हल्ला अवघ्या मानवतेवरील हल्ला असल्याचे विधान केले होते.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलेदिमीर झेलेन्स्की यांनी गत महिन्यातच संयुक्त राष्ट्रात बोलताना रशियाचा युक्रेनवरील हल्ला अवघ्या मानवतेवरील हल्ला असल्याचे विधान केले होते.

पीस म्हणजे शांतता हाच अजेंडा

एका प्रश्नाच्या उत्तरात हुसैन म्हणाले - या जी-20 परिषदेचा पीस म्हणजे शांतता हाच सर्वात मोठा अजेंडा आहे. याशिवाय आरोग्य, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन व ऊर्जावरही आमचे लक्ष केंद्रीत आहे. आम्हाला संघर्ष नव्हे तर शांतता हवी आहे.

रशिया व युक्रेन युद्ध 24 फेब्रुवारीला सुरू झाले होते. ते अद्याप सुरू आहे. मागील आठवड्यात रशियाने युक्रेनच्या 4 राज्यांवर रेफरेंडम अर्थात जनमत चाचणीच्या नावाखाली कब्जा केला होता. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांनी जून महिन्यातच पुतीन व झेलेन्स्की यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना अपयश आले. यंदाच्या जी-20 परिषदेत अन्न संकट व सीरियातील नागरी युद्धावरही चर्चा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...