आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्ध अपडेट्स:​​​​​​​कीव्ह ताब्यात घेता न आल्याने पुतीन यांचा तिळपापड, क्रामटोर्स्कवर क्षेपणास्त्र हल्ला करणाऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविली लष्कराची सूत्रे, कीव्हच्या रस्त्यावर झेलेन्स्की-जॉन्सन

कीव्ह/मॉस्कोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला आता दीड महिना लोटला आहे. पण, अद्याप हे युद्ध कोणत्याही तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचले नसल्यामुळे रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन संतापलेत. आता त्यांनी लष्करात मोठे फेरबदल करत युक्रेनच्या क्रामटोर्स्क रेल्वे स्थानकावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या जनरल अलेक्झांद्र डोरनिकोव्ह यांची लष्कराच्या कमांडरपदी नियुक्ती केली आहे.

जनरल अलेक्झांद्र एक आक्रमक लष्करी अधिकारी आहेत. आता युक्रेनमधील लष्करी कारवाईचे ते नेतृत्व करतील. यावेळी प्रथमच रशियाने युक्रेनमधील पायदळ, नौदल व हवाई दलाच्या तुकड्यांत ताळमेळ बसवण्यासाठी सेंट्रल कमांडची स्थापना केली आहे. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत रशियाचे 7 जनरलस्तरीय अधिकारी मारले गेलेत. युद्ध लांबल्यामुळे पुतीन यांनी हा निर्णय घेतला आहे.

युद्धाशी संबंधित अपडेट्स...

  • लुहान्स्कचे गव्हर्नर सेरही गदाई यांनी रशियन हल्ल्यामुळे नागरिकांना तातडीने शहर सोडण्याचे आवाहन केले आहे.
  • युक्रेनने रशियाच्या अनेक तुकड्यांतील 80 टक्के सैनिकांनी युद्ध लढण्यास नकार दिल्याचा दावा केला आहे.
  • रशियाने युक्रेनच्या 12 सैनिक व 14 नागरिकांची सुटका केली आहे. त्यांना युद्धादरम्यान अटक करण्यात आली होती.

कीव्हच्या रस्त्यावर फिरताना दिसले झेलेन्स्की व जॉन्सन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन युक्रेनच्या दौऱ्यावर पोहोचलेत. ते शनिवारी कीव्हच्या रस्त्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत फेरफटका मारताना दिसून आले. जॉन्सन यांनी युक्रेनला तब्बल 9.8 अब्ज रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच आधूनिक क्षेपणास्त्रांसह अन्य दारुगोळा देण्याचाही निर्णय घेतला आहे.

जॉन्सन यांनी कीव्हच्या नागरिकांशी संवाद साधत ब्रिटन युक्रेनच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले.
जॉन्सन यांनी कीव्हच्या नागरिकांशी संवाद साधत ब्रिटन युक्रेनच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले.
बोरोदियांका शहरातील नागरिकांनी रशियाच्या हल्ल्याच्या भीतीने पलायन सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्राने युक्रेनच्या जवळपास 43 लाख नागरिक परदेशांत, तर 65 लाख नागरिक देशातच अन्यत्र विस्थापित झाल्याचे म्हटले आहे.

कीव्ह एक्सप्रेस-वेवर रशियन रणगाडा उद्ध्वस्त झाल्यानंतर व्हिक्ट्री साइन दाखवताना युक्रेनी महिला.
कीव्ह एक्सप्रेस-वेवर रशियन रणगाडा उद्ध्वस्त झाल्यानंतर व्हिक्ट्री साइन दाखवताना युक्रेनी महिला.
रशियाच्या हल्ल्यात घर उद्ध्वस्त झाल्यानंतर कीव्हच्या रस्त्यालगत बसलेले हे वयोवृद्ध दाम्पत्य
रशियाच्या हल्ल्यात घर उद्ध्वस्त झाल्यानंतर कीव्हच्या रस्त्यालगत बसलेले हे वयोवृद्ध दाम्पत्य