आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतिन यांच्या भवनावर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न:रशियाचा दावा युक्रेनने रचला व्लादिमीर पुतीन यांची हत्या करण्याचा कट; युक्रेन म्हणाले- आमचा हात नाही

माॅस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेले दोन ड्रोन पाडण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या घटनेबाबत रशियाने दावा केला की, युक्रेनने राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा कट रचला होता. तथापि, हल्ल्याच्या वेळी पुतीन राष्ट्रपती भवनात नव्हते. तसेच इमारतीचेही फारसे नुकसान झालेले नाही.

हल्ला करण्यासाठी आलेल्या ड्रोनला स्पेशल सर्व्हिसेसने रडारद्वारे वेळीच पाडले. ९ मे रोजी होणाऱ्या व्हिक्टरी डेच्या आधीच घडलेल्या या घटनेनंतर रशिया प्रत्युत्तराची कारवाई करू शकतो. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांचे प्रवक्ते सर्गेई यांचे प्रवक्ते सर्गेई निकिफोरोव्ह म्हणाले, आम्हाला या घटनेबाबत कोणतीही माहिती नाही. आम्ही फक्त आमच्या देशाचे संरक्षण करत आहोत, दुसऱ्यांवर हल्ला करण्याचा आमचा कुठलाही इरादा नाही. या हल्ल्याशी आमचा कसलाही संबंध नाही. निकिफोरोव्ह म्हणाले, आम्हाला या घटनेबाबत कोणतीही माहिती नाही. आम्ही फक्त आमच्या देशाचे संरक्षण करत आहोत, दुसऱ्यांवर हल्ला करण्याचा आमचा कुठलाही इरादा नाही. या हल्ल्याशी आमचा कसलाही संबंध नाही.