आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:व्लादिमीर पुतीन बुद्धिमान, त्यांनी घोडचूक केली : ट्रम्प, युक्रेन युद्धाच्या प्रश्नावर गोलमाल उत्तर

वॉशिंग्टन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात युक्रेनच्या विजयाबाबत गोंधळात टाकणारे उत्तर दिले. एका कार्यक्रमात त्यांना विचारले की, रशियाविरोधातील युद्धात युक्रेन जिंकावे,असे तुम्हाला वाटते का? त्याकडे दुर्लक्ष करत ट्रम्प म्हणाले युरोपने आणखी पैसा लावावा. आम्ही १४ लाख कोटी रु. खर्च करत आहोत. युरोप त्याच्या शेजारी आहे आणि १.६४ लाख कोटी रु. खर्च करत आहे. त्यांनी बरोबरीने खर्च करावा. पुतीन बुद्धीमान आहेत. त्यांनी मोठी चूक केली. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर त्यांनी असे कधी केले नसते. मी २४ तासांत युद्ध समाप्त करेल.

मी मुलांची शपथ खातो...
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, न्यूयॉर्कमध्ये एका ज्युरीने मला सांगितले होते की, त्यांनी १९९० च्या दशकात एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूमध्ये तिचे लैंगिक शोषण केले होते. प्रत्यक्षात तिला कधी मी भेटलोही नाही. मी तिला ओळखत नाही. कधी भेटलोही नाही. मी मुलांची शपथ घेतो. हे मी केले नाही. ही महिला कोण आहे याची माहिती नाही. ही कथा रचली आहे.