आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या प्रेयसी अलिना काबाएव्हा (वय- 39) हिच्यासाठी एक आलिशान राजवाडा बांधला आहे. हा महल सोन्याचा मॉस्को शहरापासून 250 मैल अंतरावर वलदई तलावाच्या जंगलात आहे. या ठिकाणी पुतिन यांच्यासाठी अनेक कक्ष बांधण्यात आलेले आहेत.
रशियाच्या शोध पत्रकारिता करणारी बेवसाईट 'द प्रोजेक्ट' च्या रिपोर्टनुसार, पुतिन यांनी गर्लफ्रेंड अलिनासाठी 13 हजार स्क्वेअर फूटमध्ये सुमारे 990 कोटी रुपयांत हा महल तयार केला आहे. हा वाडा पुतिन यांच्या विशेष राजवाड्यापासून फक्त 800 मीटर अंतरावर आहे. त्यात लाकडी काम करण्यात आले असून माणिक मोत्यांनी जडलेले झुंबर लटकलेले आहेत. या ठिकाणी एक मोठे मैदान देखील आहे.
आधी पाहा आलिशान राजवाड्याची छायाचित्रे...
ब्लॅक मनीतून उभारला महाल
हे आलिशान घर बांधण्यासाठी काळा पैसा वापरण्यात आला आहे. वृत्तानुसार, पुतीन यांचे बँकर म्हणून ओळखले जाणारे रशियन उद्योगपती युरी कोवलचॅक यांच्या कंपनीने सायप्रसमध्ये जमा केलेला काळा पैसा या घरात गुंतवला असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या कार्यकारिणीने ही माहिती दिली आहे. ते युक्रेनने रशियावर केलेल्या हल्लामुळे नाराज आहेत.
अलिनाकडे ब्लॅक-समुद्राच्या किनाऱ्यावरील सर्वात मोठे अपार्टमेंट
अलिना यांना 2014 मध्ये कोवलचॅकच्या कंपनी नॅशनल मीडिया ग्रुपची प्रमुख बनवण्यात आले होते. यामुळे तिला 8.6 दशलक्ष पौंड वार्षिक उत्पन्न मिळते. त्यांच्याकडे अनेक आलिशान मालमत्ता आहेत. ब्लॅक-सी जवळ सोचीमध्ये एक पेंटहाऊस आहे. जे सर्वात मोठे अपॉइंटमेंट आहे.
अलिना पुतिन यांची प्रेयसी
द गार्डियन सारख्या अनेक वृत्तपत्रांनी अलिना या पुतिन यांची मैत्रीण असल्याचा दावा केला आहे. मात्र, पुतिन यांनी हे कधीही जाहीरपणे सांगितले नाही. पुतीन आणि मुलांसोबत अलिनाच्या जवळीकीच्या बातम्या अनेकदा मीडियात येतात. अलिना एक रशियन राजकारणी, मीडिया मॅनेजर आणि सेवानिवृत्त रिदमिक जिम्नॅस्ट आहे. तिने आपल्या कारकिर्दीत 2 ऑलिम्पिक पदके, 14 जागतिक चॅम्पियनशिप आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली.
पुतिन हेही कथित मुलीचे वडील !
पुतिन यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामध्ये सुवर्णपदक जिंकणारी जिम्नॅस्ट अलिना कबाएव्हा हीचे नाव प्रथमस्थानी आहे. पुतिन यांना त्यांची मैत्रीण अलिना काबाएव्हाकडून तिसरी मुलगी असल्याचीही चर्चा देखील आहे. परंतू याला अद्यापही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. रशियन मीडियाने 18 वर्षीय एलिझाबेथ क्रिव्होनोगिखचे वर्णन पुतीनची मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुतीन यांच्या गुप्त कन्येबाबत, ब्रॅडफोर्ड विद्यापीठ यूके येथील व्हिज्युअल कॉम्प्युटिंग सेंटरचे संचालक प्रा. हसन उगेल म्हणाले होते की, पुतीन आणि त्यांच्या कथित मुलीचा चेहरा इतका सेम आहे. की, बाप-लेक असल्याचे कोणीही टाळू शकत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.