आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय खूप प्रतिभावंत असतात:रशियन एकता दिनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा केली भारताची प्रशंसा

मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा भारत व भारतीयांच्या प्रतिभेची प्रशंसा केली आहे. भारतीय खूप प्रतिभावंत असतात यात कोणतीही शंका नाही. भारतात खूप शक्यता आहे. विकासाच्या बाबतीत त्याला शानदार यश मिळेल, असे पुतीन यांनी रशिया एकता दिनी म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी बोलताना म्हटले आहे.

दीड अब्ज जनता खरी ताकद

भारताकडे पाहा, तेथील लोक अंतर्गत विकासासाठी खूप प्रतिभावंत व प्रेरित आहेत. विकासाच्या दृष्टीने त्याला त्याचे चांगले परिणाम मिळतील. यात कोणतीही शंका नाही. जवळपास दीड अब्ज नागरिक त्याची खरी ताकद आहे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. पुतीन मूळ भाषण रशियन भाषेत केले. रॉयटर्स वृत्तसंस्थेने त्याचे भाषांतर केले.

रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी आफ्रिकेतील वसाहतवाद, भारताची क्षमता व रशियाची असामान्य सभ्यता व संस्कृतीवरही चर्चा केली.

मोदींची यापूर्वीही केली होती प्रशंसा

पुतीन यांनी गत महिन्यातही भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली होती. 28 ऑक्टोबर रोजी ते म्हणाले होते की, त्यांच्या देशाचे भारतासोबत खास संबंध आहेत. दोन्ही देशांनी नेहमीच एकमेकांचे समर्थन केले आहे. हे समर्थन भविष्यातही कायम राहील. त्यांनी राष्ट्रहितार्थ स्वतंत्र परराष्ट्र धोरणावर चालण्यासाठीही मोदींची प्रशंसा केली होती.

पुतीन यांनी हे विधान मॉस्को स्थित थिंक टँक वालदाई इंटरनॅशनल डिस्कशन क्लबच्या गुरुवारी आयोजित पूर्ण अधिवेशनाला संबोधित करताना केली होती.

युक्रेनशी युद्ध

रशियाचे मागील फेब्रुवारी महिन्यापासून युक्रेनसोबत युद्ध सुरू आहे. प्रारंभी या युद्धात युक्रेन अवघ्या एक-दोन दिवसांत नांगी टाकेल, असे वाटले होते. पण त्याने आतापर्यंत रशियाला चांगलेच झुंजवले आहे. सद्यस्थिती पाहता युक्रेन आणखी काही महिने सहजपणे रशियाला लढा देईल, असे दिसून येत आहे. दोन्ही देशांतील या युद्धामुळे जगावर तिसरे महायुद्ध ओढावण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...