आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनवर अणुहल्ल्याचे सावट:ब्लादिमीर पुतीन यांनी दिले अणु युद्धाच्या सरावाचे आदेश, आपल्या कुटूंबियांना सायबेरियात पाठवले

कीव्ह/मॉस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत 25 दिवसांपासून सुरु असणारे रशिया-युक्रेन युद्ध आता अणु युद्धाच्या दिशेने सरकण्याची भीती निर्माण झाली आहे. काही माध्यमांनी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आपल्या लष्कराला आण्विक युद्धाचा सराव करण्याचे आदेश दिल्याचा दावा केला आहे. तसेच यासाठी त्यांनी आपल्या कुटूंबालाही सायबेरियातील एका सुरक्षित ठिकाणी पाठवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अणुयुद्धाचे संकेत पूर्वीपासूनच मिळत होते. पण, रशियाने नुकताच युक्रेनवर किन्झॉल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा हल्ला केला. हे क्षेपणास्त्र आण्विक व पारंपरिक अशा दोन्ही प्रकारचे पेलोड घेवून जाण्यास सक्षम आहे. त्यामुळे या युद्धाची शंका आता बळावली आहे. 2000 किमीचा पल्ला असणाऱ्या किन्झॉलद्वारे अणुबॉम्बही टाकता येतो.

पुतीन यांचे अधिकारी दहशतीत

न्यूक्लियर वॉर ड्रिलच्या सरावाचे आदेश मिळतच क्रेमलिनच्या (रशियन अध्यक्षांचे कार्यालय) अधिकाऱ्यांत दहशत पसरली आहे. त्यांच्या मते, पुतीन यांच्या या निर्णयाचे परिणाम अत्यंत भयावह असू शकतात. त्यांनी या सरावात स्वतः पुतीन इव्हॅक्युएशनच्या सरावात सहभागी होतील.

पुतीन यांनी कुटूंबाला सायबेरियाला पाठवले

रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रारंभीच काही बातम्यांत पुतीन यांनी आपल्या कुटूंबियांना सायबेरियात पाठवल्याचा दावा करण्यात आला होता. तिथे त्यांना एका हाय-टेक भूमिगत बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे.

प्रथम न्यूक्लियर फोर्सेस अ‍ॅलर्टवर

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी यापूर्वीच आपल्या आण्विक दलाला हल्ल्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. पुतीन यांनी न्यूक्लियर कमांडच्या यूनिटच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना या हल्ल्याची तयारी करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून सर्वच न्यूक्लियर क्षेपणास्त्रे फायरिंग मोडमध्ये ठेवण्यात आली आहेत. स्टाफलाही स्टँडबायवर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत.

युक्रेन झुकण्यास तयार नाही

युद्धाच्या 25 दिवसांनंतरही युक्रेन शस्त्र टाकण्यास तयार नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की एका संदेशाद्वारे हा हेतुपुरस्सर करण्यात आलेला हल्ला असल्याचे म्हणाले होते. ही हत्या आहे. जाणिवपूर्वक करण्यात आलेली हत्या. हे आम्ही केव्हाही विसरणार नाही. तसेच यात सहभागी लोकांना कधी माफही करणार नाही. युक्रेन आपल्या भूमीवर रक्तपात करणाऱ्या सर्वांना शिक्षा देईल, असे ते म्हणाले होते. दरम्यान, हे युद्ध रोखण्यासाठी दोन्ही देशांत शांतता चर्चाही सुरू आहे. झेलेंस्की यांनी पुतीन यांनाही थेट चर्चेचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...