आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Vladimir Putin Ukraine President | Ukraine President Zelensky Share A Video, Says I Am In Kyiv Kiev | As Russia Continues Its Attacks On The Capital, Kiev, A Video Of The Ukrainian President Surfaced, Saying, "I Am Standing In Kiev To Defend Ukraine." | Marathi News

रशिया-युक्रेन युद्ध:पळून गेल्याची चर्चा असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडिओ आला समोर, म्हणाले- युक्रेनच्या रक्षणासाठी मी कीवमध्ये उभा आहे!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. गुरुवारपासून रशिया युक्रेनच्या भागात हल्ले करत आहे. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये देखील रशियन सैन्य घुसले आहेत. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वॉलोडिमिर झेलेन्स्की यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यांनी राजधानी कीवमधून एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले की, मी कुठेही पळून गेलेलो नाही, मी कीवमध्येच आहे, आम्ही सर्व जण युक्रेनचे रक्षण करत आहोत. असे म्हटले आहे.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. जीव वाचवण्यासाठी अनेक जण जमीनीच्या खाली अंडरग्राउंड शेल्टरमध्ये लपून बसले आहेत. यादरम्यान एक अशी बातमी समोर आली होती की, युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की हे युद्ध सोडून पळून गेले. मात्र नुकतेच त्यांनी एक व्हिडिओ जारी करत त्याला दुजोरा दिला आहे.

झेलेन्स्की म्हणाले- शत्रूंचे पहिले लक्ष्य मी आहे

युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांचा हा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वी जारी केलेल्या एका व्हिडिओत त्यांनी भावुक होत म्हटले होते की, 'मी आणि माझे कुटुंब आम्ही सर्व जण युक्रेनमध्येच आहोत. आम्ही देशद्रोही नाहीत आम्ही देखील युक्रेनचे नागरिक आहोत.' असे झेलेन्स्की आपल्या व्हिडिओत म्हणाले होते. झेलेन्स्की म्हणाले की, मला अशी माहिती मिळाली आहे की, मी रशियाचे पहिले लक्ष्य आहे. त्यानंतर माझे कुटुंब त्यांचे दुसरे टार्गेट असणार आहे. झेलेन्स्की म्हणाले की, रशिया मला संपवून युक्रेनला राजकीयदृष्ट्या नष्ट करायचे आहे. सध्या रशिया युक्रेनची राजधानी कीवला घेरण्याचे प्रयत्न करत आहे.

पुतिन यांनी युक्रेन सैन्याला केले 'हे' आवाहन
युद्धा दरम्यान, पहिल्यांदा रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतिन यांनी देशाच्या नावाने संबोधन करत म्हटले आहे की, आमची रणनीती आणि हेतू अगदी स्पष्ट आहेत. आम्हाला युक्रेनवर कब्जा करायचा नाही. त्यामुळे युक्रेनच्या सैन्याने तात्काळ आत्मसमर्पण करावे. युक्रेनमधील सर्व लोकांना तेथील सरकारने ओलीस ठेवले आहे. झेलेन्स्कीचे सरकार ड्रग व्यसनी आणि नाझींची टोळी आहे. युक्रेनच्या लष्कराने तेथील सरकार उलथून टाकून सत्ता आपल्या हातात घ्यावी. असे आवाहन रशियाने केले आहे.

कीववर चार दिवसात रशियाचा कब्जा
रशिया सैन्य राजधानी कीवमध्ये घुसले असून, पुढील 96 तासांमध्ये म्हणजे चार दिवसात रशिया कीवमध्ये कब्जा करणार आहे. असा दावा युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. रशिया सैन्य लोकवस्ती असणाऱ्या भागात हल्ले करत आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनने देखील आपले सर्व सैन्य युद्धासाठी रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, जगाने आम्हाला या युद्धात लढण्यासाठी इकटे सोडले आहे.

बातम्या आणखी आहेत...