आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानववर्षाच्या पहिल्या दिवशीही रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन व युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात वाक्युद्ध रंगले. या दोघांनी नववर्षाच्या निमित्ताने आपापल्या देशांना संबोधित केले. पुतीन आपल्या 9 मिनिट लांब संबोधनात म्हणाले - सैन्य आपली मातृभूमी, ईमानदारी व न्यायासाठी युद्ध करत आहे. आम्ही युद्ध जिंकू, आपल्या कुटुंबांसाठी, रशियासाठी.
दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पुतीन यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले - पुतीन स्वतःच्याच नागरिकांना म्हणजे रशियन नागरिकांना उद्ध्वस्त करत आहे. ते आपल्या सैनिकांचे नेतृत्व करत नाहीत, तर त्यांच्यामागे लपत आहेत.
सैनिकांसमोर उभे राहून विजयाचा संदेश
पुतीन यांचे भाषण रशियाच्या सरकारी टेलिव्हिजनने देशभरात दाखवले. यात ते सैनिकांसमोर उभा असल्याचे दिसून येत आहेत. पुतिन म्हणाले- गतवर्षी आम्ही अनेक गोष्टी सुधारल्या. कपट व भ्याडपणाच्या तावडीतून आम्ही धैर्य व पराक्रमाची सुटका केली. आपण सर्व मिळून सर्व संकटांवर मात करू. आपल्या देशाची महानता वाचवू.
अमेरिकेवर युद्ध भडकवल्याचा आरोप
पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर रशियाला युद्ध करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. ते म्हणाले - अमेरिका व पाश्चात्य देश खोटे बोलले. आता ते युक्रेन आणि तेथील लोकांचा रशियाविरोधात वापर करत आहेत. ते आम्ही कदापि सहन करणार नाही.
2022च्या शेवटच्या दिवशीही युद्ध सुरूच
2022 संपतानाही रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देश स्फोटांच्या आवाजांनी हादरला. या हल्ल्यांत युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये 1 जण ठार, तर 8 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे कडाक्याच्या थंडीत नवीन वर्ष साजरे करण्याच्या तयारीत असलेल्या युक्रेनच्या जनतेला मोठा धक्का बसला. गेल्या 3 दिवसांत रशियाने युक्रेनवर केलेला हा दुसरा मोठा क्षेपणास्त्र हल्ला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.