आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:व्हाेडका घ्या, ट्रॅक्टर चालवा, काेराेना हाेत नाही म्हणणाऱ्या बेलारुस अध्यक्षांचविरोधात संताप

मिंस्क10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाेकांचा तीव्र विराेध, ‘काॅक्राेच’ विराेधात ‘चप्पल’ क्रांती

व्हाेडका प्या, ट्रॅक्टर चालवा. स्टीमबाथ केल्याने काेराेना हाेत नाही, हे विधान बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी केले आहे. बरळलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या विधानावरून देशात संतापाची लाट असून लाेक रस्त्यावर उतरले आहेत. बेलारुस हा रशिया व युक्रेनचा शेजारील देश. परंतु सध्या राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंकाे यांच्या विराेधातील नाराजीमुळे जास्त चर्चेत आहे. ते १९९४ पासून आतापर्यंत म्हणजे पाच वेळा राष्ट्रपती बनले.

लुकाशेंकाे यांनी रशियाची मदत, लाेकानुनय करणारी आश्वासने, अनुदानांचे प्रलाेभन इत्यादींच्या बळावर ते विजयी झाले हाेते. लाेकांनी एक ब्लाॅगर सर्गेई तिखानाेव्हस्की यांना राष्ट्राध्यक्ष करण्याचे ठरवले आहे. सर्गेई यांनी आपल्या ब्लाॅगवर लुकाशेंकाे यांच्या धाेरणाला विराेध करून लहान मुलांच्या कवितेतील एक पात्र माईटी काॅक्राेचच्या धर्तीवर काॅकराेच त्यांचे असे नामकरण केले. ‘झुरळाला चपलेने चेचून टाकायचे आहे,’ असा संदेशही त्यांनी दिला हाेता. सर्गेई तुरुंगात आहेत.

बातम्या आणखी आहेत...