आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Volkswagen Company Car Fire | Marathi News | Cargo Ship Fire In The Atlantic Ocean; Nearly 4,000 Luxury Cars Worth Billions Burned At Sea, Volkswagen's Big Loss!

जहाजाला आग:अटलांटिक महासागरात मालवाहू जहाजाला आग; कोट्यवधी किमतीच्या सुमारे 4,000 आलिशान गाड्या समुद्रात जळून खाक, फोक्सवॅगनचे मोठे नुकसान!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पनामाहून निघालेल्या फेलिसिटी एस नावाच्या मालवाहू जहाजाला 16 फेब्रुवारीला अटलांटिक महासागरातील अझोरेस बेटाजवळ आग लागली. त्या जहाजात फोक्सवॅगन या कंपनीच्या 3,965 लक्झरी कार होत्या, त्या सर्व जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये लॅम्बोर्गिनी, पोर्श आणि ऑडीसारख्या लक्झरी ब्रँडच्या गाड्यांचा समावेश आहे. या जहाजावरील सर्व 22 क्रू मेंबर्सची पोर्तुगीज नौदल आणि हवाई दलाने सुटका केली असून, त्यांना सुरक्षित हॉटेलमध्ये नेले आहे. नौदलाने त्यांच्या एका निवेदनातून ही माहिती दिली आहे की, या जहाजावर असलेल्या आलिशान गाड्यांची संख्या कोट्यवधी रुपयांची असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप फॉक्सवॅगनने किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती दिलेली नाही.

पॉर्शच्या सुमारे 1100 कार जळून खाक

फॉक्सवॅगन यूएस ऑपरेशन्सद्वारा ब्लूमबर्ग या वेबसाईटला माहिती देण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, शिप 100 हून अधिक GTR, गोल्फ आर आणि ID.4 मॉडेल्स घेऊन टेक्सासमधील ह्यूस्टन बंदरासाठी रवाना झाले होते. पोर्शच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा फेलिसिटी एसला आग लागली तेव्हा त्यात ब्रँडच्या सुमारे 1,100 कार त्यामध्ये होत्या. मात्र, लॅम्बोर्गिनीने या जहाजावरील गाड्यांची संख्या अद्याप उघड केलेली नाही. कंपन्यांनी सांगितले की, नुकसान आणि वर्तमान माहितीसाठी आम्ही सतत शिपिंग कंपनीच्या संपर्कात आहोत. या जहाजावर असलेल्या आलिशान गाड्यांची संख्या कोट्यवधी रुपयांची असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप या आकड्याला फॉक्सवॅगनने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

यापूर्वी देखील घडली होती अशीच घटना

मालवाहू डेकवर आग लागली तेव्हा फेलिसिटी एस डेव्हिसविले पोर्टकडे जात होते, आग लागल्याबरोबर एक सिग्नल जारी करण्यात आला. नौदलाने सांगितले की, सध्या या जहाजाचे मालक जहाजापर्यंत पोचत आहेत. फोक्सवॅगनच्या गाड्यांची समुद्रातून वाहतूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी 2019 मध्ये अमेरिकेच्या गाँडे भागात देखील एक घटना घडली होती. जहाजाला आग लागल्याने जहाजासह ऑडी आणि पोर्श सारख्या 2,000 लक्झरी कार पाण्यात बुडाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...