आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावावर रविवारी नॅशनल असेंब्लीमध्ये मतदान होणार आहे. इम्रान खानचे स्कोअर कार्ड त्यांचा पराभव सांगणारे आहे. परंतु इम्रान खान यांची खुर्ची वाचवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दिसते. इम्रान खान यांच्या किचन कॅबिनेटमध्ये सामील मूठभर लोकांमुळे हे सर्व होत आहे. इम्रान खान आपल्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी करत आहेत. याबरोबरच इम्रान यांनी स्वपक्षातील बंडखोरांच्या विरोधात हल्लाबोल करण्याचे आवाहनही केले आहे.
बंडखोर सदस्यांच्या घरासमोर जमावाने एकत्र येऊन आंदोलन करण्याची सूचना त्यांनी केली. त्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. रविवारी नॅशनल असेंब्लीत मतदान प्रक्रिया सुरू असताना देशभरातील लोकांनी लाखोंच्या संख्येने इस्लामाबादेत यावे, असे खुले आवाहन त्यांनी केले आहे. वरकरणी इम्रान यांनी समर्थकांना शांतता राखण्यास सांगितले खरे; परंतु प्रत्यक्षात परिस्थिती अशांततेकडे नेणारी आहे, असे दिसते. खुर्ची वाचवण्यासाठी इम्रान कोणत्या थराला जातील, याची चुणूक त्यांच्या शनिवारी केलेल्या भाषणातून आली आहे. माझ्याकडे रविवारच्या मतदानासाठी आणखी एक प्लॅन आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. संख्याबळाच्या बाबतीत इम्रान खान पिछाडीवर आहेत. शनिवारी इस्लामाबादेत रेड अलर्ट लागू करण्यात आला. ठिकठिकाणी निमलष्करी दल तैनात आहे.
आणीबाणी लागू करण्याचे मनसुबे
इम्रान खान यांना आणीबाणी लागू करण्याचा बहाणा हवा आहे. रणनीतीनुसार असेंब्लीच्या सभापतींना मतदान प्रक्रियेत विलंबाने पाठवणे किंवा मतमोजणीत घोळ घालण्याची सूचना आहे. सोबतच राष्ट्रपतींनाही नवीन पंतप्रधानांच्या शपथविधीमध्ये विलंब करण्यास सांगण्यात आले आहे. सभापती व राष्ट्रपतींनी नकार दिला.
परदेशी कटाच्या कार्डने खुर्ची वाचवण्याचे प्रयत्न
आपली खुर्ची वाचवण्यासाठी इम्रान खान वारंवार परदेशी षड्यंत्र कार्ड वापरू लागले आहेत. पाकिस्तानात सुख नांदावे असे परदेशी शक्तीला वाटत नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ व इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा परदेशी कटात हात असल्याचा इम्रान यांचा आरोप आहे.
अमेरिका सदैव मित्र, सकाळी बाजवांचे विधान
इम्रान यांनी गुरुवारी एका भाषणात अमेरिकेसोबत दुरावा आणि रशियासोबतची मैत्रीवर भाष्य केले होते. पाक लष्करप्रमुख कमर बाजवा शनिवारी म्हणाले, अमेरिका पाकिस्तानचा जुना मित्र आहे. त्याचबरोबर रशियाचे युक्रेनवरील हल्ले थांबवण्याचेही त्यांनी म्हटले.
लष्करावर टीका नको, सायंकाळी इम्रान म्हणाले
इम्रान यांनी शनिवारी नागरिकांशी लाइव्ह चर्चा केली. ते म्हणाले, लष्करावर टीका करू नका. रविवारी इस्लामाबादेत मोठ्या संख्येने जमणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. परदेशी शक्तींचा कट आहे, त्यामुळे लष्करावर टीका करू नका, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.