आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:फ्रान्समध्ये संसदीय निवडणुकीत मतदान; मॅक्रॉन यांना 5 पक्षांच्या आघाडीचे आव्हान

पॅरिस19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिलमध्ये राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवणारे इम्यॅन्यूएल मॅक्रॉन यांना संसदीय निवडणुकीत आता सोशलिस्ट व कम्युनिस्टसह पाच पक्षांच्या आघाडीचा सामना करावा लागत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात रविवारी सायंकाळपर्यंत १८.३ टक्के मतदान झाले. गेल्या वेळेच्या तुलनेत त्यात ०.८ टक्के घट झाली. मतदानाचा दुसरा टप्पा १९ जून रोजी होणार आहे. सरकार वाचवण्यासाठी आणि अनेक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मॅक्रॉन यांना ५७७ पैकी २८९ जागी विजय मिळवावा लागेल. मॅक्रॉन यांना डावे ज्यां ल्यूक मिलोशांं (७०) आणि त्यांच्या न्यूम्स नावाच्या आघाडीने पाठिंबा दिला.मतदानपूर्व चाचणीनुसार मॅक्रॉन सर्वाधिक जागा जिंकतील. परंतु बहुमतापासून दूर राहतील. त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...