आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजची सकारात्मक बातमी:स्मार्ट टीव्ही व्यवसायाची वयाच्या 24 व्या वर्षी केली सुरुवात, आज भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिला आहे, 1200 कोटी रुपये आहे नेटवर्थ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज देविता जवळ संपूर्ण भारतात 10 लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत, तिची कंपनी जगातील 60 देशांमध्ये टीव्ही विकते
  • फॉर्च्युन इंडिया (2019)) मधील 50 बलाढ्य महिलांमध्ये देविता यांचेही नाव आहे, पंतप्रधान मोदींनीही केले आहे कौतुक

आयआयएफएल वेल्थ आणि हुरुन इंडियाने अलीकडेच 40 आणि त्यापेक्षा कमी वयाच्या सेल्फ मेड श्रीमंतांची यादी जाहीर केली. या यादीतील एकमेव महिला 39 वर्षीय देविता सराफ आहे. या यादीत त्या 16 व्या स्थानावर आहेत. देविता व्हीयू ग्रुपच्या सीईओ आणि अध्यक्ष आहेत. फॉर्च्युन इंडिया (2019) च्या 50 सर्वाधिक पॉवरफुल वुमन महिलांमध्येही त्यांचे नाव आले आहे. 2018 मध्ये भारत जगातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये देविता सराफ यांचा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 1200 कोटी आहे.

देविता सराफ यांनी हार्वर्ड यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. त्या जेनिथ कंप्यूटरचे मालक राजकुमार सराफ यांची मुलगी आहेत. त्यांना नेहमीच काहीना काही वेगळे करायचे होते. यामुळे फॅमिली बिझनेस सांभाळला नाही. 2006 मध्ये जेव्हा टेक्नोलॉजीमध्ये झपाट्याने बदल होत होते आणि अमेरिकेत गूगल आणि अॅपलसारख्या कंपन्या मोबाइल आणि कम्प्यूटरमध्ये गॅप संपवण्याच्या प्रयत्नात होती, तेव्हा देविता यांनी काही तरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी टीव्ही व्यवसायाची निवड केली. त्यांनी VU टीव्हीची सुरुवात केली. जी टीव्ही सीपीयूचे मिश्रित रुप होते.

त्यांची कंपनी लेटेस्ट तंत्रज्ञानात चांगले काम करत आहे. देविता यांची कंपनी अडवान्स TV बनवते. या टीव्हीवर यू-ट्यूब आणि हॉट स्टारसारखे अॅपही सहज चालवले जातात. म्हणजेच ही टीव्ही कम कम्प्यूटर असते. या माध्यमातून तुम्ही मल्टी टास्किंग करु शकता. यासोबतच कंपनी एंड्रॉयडवर चालणाऱ्या डाय डेफिनेशन टीव्हीही बनवते. मोठ्या स्क्रीनसोबत कंपनीजवळ कॉरपोरेट यूजची टीव्ही देखील आहे.

देविता यांनी कंपनी सुरू केली होती तेव्हा त्यांचे वय अवघे 24 वर्षे होते. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या, मात्र जवळपास 6 वर्षांनंतर 2012 मध्ये त्यांची कंपनी प्रॉफिटमध्ये आली. 2017 मध्ये कंपनीचा टर्नओवर जवळपास 540 कोटींपर्यंत पोहोचला होता. यानंतरपासून सतत वाढत गेला. आज देविता यांच्याजवळ संपूर्ण भारतात जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. कंपनी जगातील 60 देशांमध्ये आपली टीव्ही विकते.

मुलगी आहे समजून गांभीर्याने घेत नव्हते लोक

देवितासाठी कंपनीला या ठिकाणी पोहोचवणे सोपे नव्हते. एका मुलाखतीत देविता म्हणाल्या की जेव्हा त्या व्यवसायाच्या संदर्भात एखाद्या व्यापाऱ्यास किंवा उत्पादकाला भेटायच्या तेव्हा लोकांनी त्यांना मुलगी समजून गांभीर्याने घेतले नाही. काही लोकांना वाटले की ती मुलगी आहे आणि ती इतका मोठा व्यवसाय कसा सांभाळेल. देविता यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्हाला पुढे जायचे असेल तेव्हा अशा गोष्टींची काळजी करू नका. मात्र, आता लोकांची विचारसरणी बदलत आहे, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांना पाहून बर्‍याच लोकांना असे वाटते की त्यांच्या मुलीही आपला व्यवसाय वाढवू शकतात.

पंतप्रधान मोदींनीही केली आहे स्तुती

चार वर्षांपूर्वी व्ही यू टेलिव्हिजिन्सच्या को-फाउंडर आणि सीईओ देविता सरफा यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची इवांका म्हटले होते.
चार वर्षांपूर्वी व्ही यू टेलिव्हिजिन्सच्या को-फाउंडर आणि सीईओ देविता सरफा यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची इवांका म्हटले होते.

2017 मध्ये देविता यांनी यंग सीईओंसोबत पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये न्यू इंडियासाठी या सीईओजना आपल्या आयडिया देण्यास सांगितले होते. देविता यांनी या कार्यक्रमात मेक इन इंडियावर आपले मत मांडले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणामध्ये त्यांच्या आयडियाचा उल्लेखही केला होता.

हार्डवर्किंग यशाचा मूलमंत्र
एका मुलाखतीत देविता सराफ म्हणाल्या की, त्या हार्डवर्किंग आणि तरुण महिलांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या देशातील अनेक युवा महिलांना प्रोत्साहित करण्याचे काम करत आहेत. त्या म्हणतात की, त्यांना आता या गोष्टींवर विश्वास बसला आहे की, कंकपन्यांचे सीईओही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. देविता म्हणतात की, महिलांना केवळ त्यांच्या सुंदरतेमुळेच नाहीत, तर त्यांच्या टॅलेंटमुळेही त्यांचे कौतुक व्हायला हवे.

बातम्या आणखी आहेत...