आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्स वृत्त:चीन केमिकल नशेचा कारखाना, मेक्सिको सेल्समन, भारताला बनवतायत अड्डा : वांडा ब्राऊन

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात नशेचा व्यापार सुमारे ५० लाख कोटी रुपयांचा आहे. सर्दी-पडसे यांच्या औषधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांपासून कोकेन व हेरॉइनहून धोकादायक परंतु स्वस्त ड्रग बनवले जात आहेत. त्यास सिंथेटिक ड्रग म्हटले जात आहे. त्याला लहान लहान प्रयोगशाळेत तयार केले जात आहे. त्याला बनवण्यासाठी शेतीचीही गरज नाही. बुकिंग्ज इन्स्टिट्यूशनच्या संचालक वांडा फेलबाब ब्राऊन यांनी हा दावा केला आहे. इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड एलिसिट ट्रॅफिकिंगच्या निमित्ताने भास्करचे रितेश शुक्ल यांनी त्यांच्याशी केलेली चर्चा.

ड्रग कार्टेल सिंथेटिक ड्रग्जवर जोर का?

सिंथेटिक ड्रग्ज कोविडपूर्वीही दशकांपासून वापरात होते. पंजाब, हिमाचलपर्यंत ते पोहोचले आहेत. लॉकडाऊननंतर शेतीपासून ग्राहकापर्यंत नशेचे उत्पादन पोहोचवण्यात माफियाला अनेक संकटे आली. उदाहरणार्थ-कोलंबियात एक किलो कोकेन बनवण्यासाठी सुमारे ८० रुपये प्रतिकिलोसाठी ४०० किलो कोकोची पाने लागतील. ते तयार झाल्यानंतर या ३२ हजार रुपये खर्चाच्या कोकेनला ६५ हजार रुपयांत कार्टेल खरेदी केले जाते. लास वेगासमध्ये ग्राहकाला हेच १ किलो कोकेन १ कोटी रुपयांत मिळते. लहान लहान प्रयोगशाळेत औषधी निर्मितीच्या कामातील रसायनांच्या साहाय्याने सहजपणे व कमी खर्चात सिंथेटिक ड्रग्ज बनते. जोखीम व खर्च कमी आहे. त्यामुळेच कार्टेलने लोकांची निवड आणि फ्रँचायझी नेटवर्कवर काम केले. सिंथेटिक ड्रग्ज लास वेगाससारख्या शहरांत तयार होत आहेत. माफिया मधला मोठा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनचा यात सहभाग काय? चीन जगातील सर्वात मोठा दुसरा औषधी निर्मितीचा कारखाना आहे. चीनमध्ये ५ हजार मोठे, सुमारे ४ लाख मध्यम व छोटे कारखाने आहेत. त्यापैकी अनेक बेकायदा आहेत. कोविडपूर्वी फेंटानिलसारखे ड्रग थेट अमेरिकेला पाठवले जात होते. चीनमध्ये मेथचे व्यसन जडू लागले आणि अमेरिकेचा दबाव वाढू लागल्यावर चीन सरकारने कारवाई केली. त्यानंतर या कंपन्यांनी अमेरिकेऐवजी कारखाने भारतात स्थलांतरित करणे सुरू झाले. सिनाओला तसेच चिनी अंडरवर्ल्डमध्ये संबंध आहे? चीनचे अंडरवर्ल्ड जगभरात नेते व नोकरशहांना आपल्या बाजूने करण्याच्या कामाला लागले आहेत. कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात नसल्यास चीनचे सरकार अशा माफियांना संरक्षण देते. सिनाओला मेक्सिकोतील सर्वात शक्तिशाली कार्टेल आहे. लॅटिन अमेरिकेहून जंग व सागरी सामग्रीच्या तस्करीसाठी चीन पाठवते. चीनहून सिंथेटिक ड्रग्जची रसायने आयात केली जातात. सामान्यपणे प्रत्येक देशात चीनचे वर्तन असेच आहे.

भारताची निवड का ? भारतातही फार्मा उद्योग वाढला आहे. त्यामुळे सिंथेटिक ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारे रसायन अर्थात प्रीकर्सर भारतात सहजपणे उपलब्ध होते. चीनमध्ये ३२ रसायनांवर सरकारची कडक नजर आहे. भारतात ही संख्या १९ आहे. गोळ्या व कॅप्सूल बनवण्याच्या यंत्रांची भारतात नोंदणी करण्याची गरज नाही. म्हणूनच चीनचे बेकायदा व्यापारी व मेक्सिकन कार्टेलसाठी भारत अनुकूल ठिकाण होत चालले आहे. प्रतिबंध का केला जात नाही?कोकेन, हेरॉइन, चरस इत्यादी कोको, अफीम, गांजा इत्यादींसाठी शेतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. अशा प्रकारची शेती लपवणे कठीण असते. औषधी कंपन्यांत तयार होणाऱ्या रसायनांचा वापर सिंथेटिक ड्रग्जमध्ये केला जातो.