आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत हिंसाचार:भारतीय दुतावास म्हणाले -राजपक्षे कुटुंबीयांनी देशात आश्रय घेतल्याच्या अफवा; लष्कराने गोळीबाराचे आदेश फेटाळून लावले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनता आंदोलन करू-करू चांगलीच संतापली आहे. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला घेराव घातला असून, अनेक पेट्रोल बॉम्ब देखील फेकले आहेत. तसेच आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गाड्या देखील जाळल्या असून अनेक मंत्र्यांची घरे देखील जाळली आहेत. यात आतापर्यंत सुमारे 200 लोक जखमी झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका खासदाराचाही समावेश आहे.

राजपक्षे कुटुंब भारतात पळून गेल्याची अफवा सुरू होती. मात्र, भारतीय दूतावासाने हे वृत्त अफवा आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. दूतावासाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मीडिया आणि सोशल मीडियावर अशा अफवा पसरवल्या जात आहेत की, काही राजकीय व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय भारतात पळून गेले आहेत, मात्र हे वृत्त चुकीचे आहे, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

मंगळवारी अशी बातमी समोर आली होती की, दुष्कृत्ये करणारे दिसताच गोळ्या घालाव्यात, असे आदेश लष्कराने जारी केला आहे. मात्र, श्रीलंकेचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि लष्कराचे कमांडर जनरल शवेंद्र सिल्वा यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सिल्वा म्हणाले की, लष्कर कोणत्याही परिस्थितीत अशी पावले उचलणार नाही. हिंसक आंदोलनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

श्रीलंकेच्या संकटाबाबतचे मोठे अपडेट्स...

  • श्रीलंकेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याचे जबाब नोंदवणार आहे.
  • श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशव्यापी कर्फ्यू 12 मे पर्यंत वाढवला आहे.
  • या हिंसाचारात आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
  • राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर विरोधक संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.
  • श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक +94-773727832 आणि ईमेल आयडी cons.colombo@mea.gov.in जारी करण्यात आला आहे.

लवकरच नवीन सरकार नेमण्याची मागणी

पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यामुळे देशात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. या संदर्भात श्रीलंकेच्या निर्यातदारांनी लवकरच नवीन सरकारची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. संयुक्त परिधान असोसिएशन फोरमने चालू हिंसाचाराचा निषेध केला आणि म्हटले की, विद्यमान राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी लवकरच नवीन सरकार नियुक्त करणे महत्वाचे आहे. आम्ही नेते आणि अधिकार्‍यांना आवाहन करतो की, देशभरात राजकीय स्थैर्य ताबडतोब प्रस्थापित करावे.

पंतप्रधान राजपक्षे नौदलाच्या तळावर लपले

महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. यानंतर ते कुटुंबासह नौदलाच्या कॅम्पमध्ये लपले असून बाहेर आंदोलक आहेत. आंदोलक राजपक्षे यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी मंगळवारी महिंदा यांच्या अटकेची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...