आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ला निनाचा काळ संपतोय, जगाच्या हवामानावर परिणाम:ऑस्ट्रेलियासह पूर्व प्रशांतमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता; पावसावर परिणाम

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक हवामान विज्ञान संघटनेने जागतिक तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. यासोबत ला निनानंतर पुढे उष्णता वाढवणारा अल निनो विकसित होऊ शकतो. यामुळे पावसाच्या पॅटर्नवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पर्यावरणाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या डाऊन टू अर्थच्या अहवालात नमूद केले की, अल निनो ३ वर्षांनंतर खूप असामान्य हवामानाचा टप्पा पूर्ण करत आहे. यामुळे जगाच्या हवामानावर खूप परिणाम होऊ शकतो.

अल निनोच्या घटनेदरम्यान प्रशांत प्रदेशातील पूर्व देश ज्यात ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन्स, थायलंड, मलेशिया, चीन आदींचा समावेश आहे. तेथे सरासरीपेक्षा जास्त उष्णता होती. दुसरीकडे, पाश्चिमेकडील देश ज्यात अर्जेंटिना, ब्राझील आदी येतात तेथे थंड राहिले. मागील वर्षी २०२२ ला निनाचे सलग तिसरे वर्ष होते. हे खूप असामान्य आहे. १९५० नंतर तीनदा झाले आहे.

प्रशांत क्षेत्रातील हवामान बदल जगावर परिणाम करू शकतो
हवामान बदल शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रशांत क्षेत्रात होणाऱ्या हवामान बदलाचा थेट परिणाम टाकतो. या कडीला “टेलिकनेक्शन’ म्हटले जाते. याचे पहिले उदाहरण १९२० च्या दशकात भौतिक शास्त्रज्ञ गिल्बर्ट वॉकर यांनी दिले होते. त्यांनी पाहिले की, ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनारपट्टीवर डार्विनमध्ये वायुमंडळाच्या दबावात बदल आणि प्रशांतच्या मध्यात ८,००० किमी दूर ताहितीच्या माध्यमातून जोडले होते.
टेलिकनेक्शन पॅटर्न आता पूर्ण जगात दिसू शकतो. जागतिक टेलिकनेक्शन पॅटर्नला आपण ढोलच्या माध्यमातून समजू शकतो. ढोलाच्या एका बाजूला थाप दिल्यास तो कंपन करतो. त्याचा आवाज हा ढोलाच्या तार किती आवळल्या आहेत यावर त्याचा आवाज अवलंबून असतो. सर्वात बळकट टेलिकनेक्शन प्रशांत खोऱ्यात आहे. ला निनामुळे अमेरिकेच्या उत्तर पश्चिम प्रशांत क्षेत्रात जास्त थंडी असते.

आफ्रिकेत पहिली हीट ऑफिसर : लोकांना उष्णतेपासून बचाव सांगणार
फ्रीटाऊन| आफ्रिकेतील देश सियारा लियोनमध्ये युजेनिया कारगबोला हीट ऑफिसरची नियुक्त केली आहे. त्या या पदावर नियुक्त होणाऱ्या आफ्रिकेतील पहिल्या अधिकारी आहेत. त्या ५ विषयांवर काम करतील.
{शहरे आणि देशात हिरवळीला प्रोत्साहन देणे. आफ्रिकी शहरांतील लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे व्हर्टिकल सिस्टिम अंगीकारावी लागेल.
{ लोकांना कमी खर्चात बचाव शिकवणे.
{ उष्णतेशी संबंधित इशारा आणि परिणामाबाबत अपडेट करणे.
{ज्ञान व अनुभव शेअर करणे, यामुळे लोक स्वत:ला उष्णतेनुसार राहू शकतील.
{ पर्यावरणाबाबत विकसित देशांचे उपाय देशभर पोहोचवणे.

बातम्या आणखी आहेत...