आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाचा दबाव:तुर्कमेनिस्तानच्या विमानतळावर दडवली होती; पुतीन यांच्या दबावाला न जुमानता अफगाणने युक्रेनला विमाने पुरवली

वॉशिंग्टन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तानने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या दबावाला न जुमानता सात हेलिकॉप्टर व लढाऊ विमाने युक्रेनला सोपवली आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आली.

तेव्हाच अफगाण पायलट आपली विमाने तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तानला घेऊन गेले होते. तेथेच ही विमाने ठेवलेली होती. त्यापैकी बहुतांश पायलट पश्चिमेकडील देशांत निघून गेले होते. हे चॉपर व जेट दोन्ही देशांत तशाच स्थितीत होते.

रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या दोन्ही देशांना ही विमाने व हेलिकॉप्टर युक्रेनला सोपवण्यास सांगितले. परंतु रशियाने दबाव वाढवला. अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिक तैनात असतानाच ही विमाने खरेदी करण्यात आली होती, असा दावा रशियाने केला. ही सर्व अमेरिकेच्या मालकीची विमाने आहेत.

बातम्या आणखी आहेत...